भीमा नदीपात्रात जिलेटीनच्या साहाय्याने बोटी उद्ध्वस्त

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा व दौंड तालुक्याच्या हद्दीतून वाहणार्‍या भीमा नदी पात्रात दोन्ही तालुक्यांच्या तहसीलदारांच्या पथकाने दि. 23 रोजी संयुक्त कारवाई करत अवैध वाळू ऊपसा करणार्‍या अनगरे, आर्वी, देऊळगाव हद्दीत नऊ लाख रुपयांच्या तीन बोटी आणि वाळू ऊपसा साहित्य जिलेटीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या.
श्रीगोंदा व दौंड तहसीलदार यांच्या संयुक्त कारवाई पथकाने भीमा नदी पात्रात अनगरे, आर्वी, देऊळगाव, परिसरातील अवैध उत्खनन करणार्‍या तीन बोटी जाळून नष्ट करण्यात आल्या आहेत. वाळू तस्करांचे अंदाजे नऊ लाखांच्या मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याची माहिती तहसीदार महेंद्र माळी यांनी दिली.
या कारवाईत जिल्हाधिकारी कार्यालयतील खनिकर्म अधिकारी बामणे, तहसीलदार श्रीगोंदा, अनगरे तलाठी पोटे, तलाठी बोरकूल, गार तलाठी भावसार, माने, आलेगाव तलाठी दिवेकर, एडुळे तलाठी देऊळगाव, अशोक मासाळ यांनी संयुक्तपणे सदर कारवाई केली आहे. यापुढे देखील अशीच संयुक्त कारवाई करून वाळू चोरी रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे पथकाच्यावतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*