सामाजिक
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकमधील पुष्कर काळे नामक व्यक्तीने अनोखे संशोधन करून त्या वस्तूचे पेटंटदेखील मिळवले आहे. हे संशोधन आहे माती परीक्षणाचे. माती परीक्षणासाठी दिलेल्या नमुन्यांचा अहवाल आता केवळ दहाव्या सेकंदाला मोबाईलमध्ये प्राप्त होणार आहे. या संशोधनामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे संशोधन आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे औचित्य आहे नाशिकमध्ये ११ जूनला होत असलेल्या माती वाचवा अभियानाचे. यादिवशी ईशा फौंडेशनचे सद्गुरू नाशिककरांना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुष्कर काळे आणि त्यांचे सहकारी राजेश पहाडी यांच्याशी आमचे प्रतिनिधी दिनेश सोनवणे यांनी साधलेला संवाद....