Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : विधानसभेचा रणसंग्राम : शिक्षण क्षेत्रात काय बदल झाला पाहिजे; काय वाटतंय तज्ञांना?

Share

नाशिक | प्रतिनिधी

अभ्यासाचा डोंगर वाढतो आहे. मुलांच्या आवड कौशल्य याबाबत फारसे बोलले जात नाही. रोजगारक्षम शिक्षण, गुणवत्ता वाढवणारे शिक्षण यांचा मेळ बसत नाही. पालक हे ‘मार्क’ वादी झालेले आहेत. मुलांनी खूप मार्क मिळवावेत व खूप पैसे मिळवावेतया पालकांच्या भूमिकेत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. यात शाळांनीही खंबीरपणे परिक्षार्थी ज्ञानार्थी कसे होतील यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. येणार्‍या सरकारने शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करुन त्यासाठीच्या खर्चाची तरतूद वाढवण्यासोबतच मुल्यवर्धीत शिक्षणासाठी आग्रह धरणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

देशदूत तर्फे आयोजित ‘देशदूत रणसंग्राम’ या चर्चासत्राच्या मालिकेत ‘शिक्षण पध्दती व आगामी सरकारकडून त्यातील बदलाबाबत अपेक्षा’ या विषयावरील चर्चासत्रात मान्यवर बोलत होते.

या चर्चासत्रात इस्पिलीअर स्कूलचे चेअरमन सचिन जोशी, जीएसटी ट्रेनर सिए विशाल पोद्दार, आनंदवन स्कूलच्या विनोदिनी कालगी, क्रिडा तज्ज्ञ केशव उगले, पूणे बोर्डाच्या कुमोदिनी जोशी, ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांची उपस्थिती होती.

यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षणपध्दतीत असलेल्या त्रूटी व आपेक्षित बदलावर मान्यवरांनी स्पष्ट मते मांडली. यात प्रामुख्याने मुलांना दिले जाणारे शिक्षण हे गुणांच्या स्पर्धेतील शिक्षण आहे. यात शिक्षण संस्था व पालकही जबाबदार आहे. मुलांना अवांतर शिक्षण देण्यावर त्यांचा कल नसतो. गुण जास्त मिळवण्यासाठीच प्रयत्न करताना मुलांची सर्वांगिण वाढ होत नाही असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

 

 

#DeshdootFBLive देशदुत रणसंग्राम विधानभेचा #Vidhansabha2019

Posted by Deshdoot on Wednesday, 16 October 2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!