मतदानातून निवडा ‘ऑनलाईन तेजस’ पुरस्काराचा मानकरी

12

नाशिक, ता. २४ : दैनिक देशदूतच्या ‘तेजस’ पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त तरुणांची ‘ऑनलाईन तेजस पुरस्कारासाठी’ आता थेट वाचकही निवड करू शकणार आहेत. यासाठीचे मतदान आजपासून देशदूत डिजिटलवर सुरू झाले आहे.

देशदूतच्या संकेतस्थळावर वरच्या बाजूला असलेल्या ‘मतदान करा’ या लिंकवर क्लिक करून विविध १२ क्षेत्रातील नामांकनप्राप्त तरुणांना मतदान करता येणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही लिंक शैअर करण्याची सोय असून वाचकांना आपल्या मित्रपरिवारात व्हॉटस्‌अप, फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम, ई-मेल मार्फत ही लिंक शेअर करून त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेता येणार आहे.

आपली कर्तबगारी आणि ज्ञानाच्या जोरावर विविध क्षेत्रांमध्ये कमी वयातच ठसा उमटविणाऱ्या तरुण तरुणींच्या कामाचा सर्वांना परिचय व्हावा, त्यांच्या यशकथा सर्वांसमोर येऊन त्यातून नवतरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि सोबतच या तरुणांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने दैनिक देशदूतने ‘तेजस पुरस्कारांना’ सुरूवात केली.

आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत दररोज एक अशा अनेक यशकथा दैनिक देशदूत आणि दैनिक डिजिटल मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. डिजिटल आवृत्तीत देशदूत तेजस पुरस्कार या लिंकवर या सर्व मुलाखती व्हिडिओसह उपलब्ध करवून देण्यात आलेल्या आहेत.

येत्या ८ सप्टेंबरला नाशिकमध्ये समारंभपूर्वक तेजस पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्याठिकाणी सर्व नामांकनप्राप्त तरुणांचा सन्मान केला जाणार असून परिक्षकांमार्फत निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रातील एका उमेदवाराला ‘तेजस पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय ऑनलाईन मतदान पद्धतीने प्रत्येक क्षेत्रातून वाचकांनी निवडलेल्या उमेदवारांला ‘ऑनलाईन तेजस पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

ऑनलाईन मतदानाच्या संदर्भातील अटी आणि शर्ती संबंधित मतदानाच्या लिंकवर तळाशी वाचकांना वाचावयास मिळतील.

12 प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

*