Video : ‘देशदूत तेजस’ची उत्सुकता शिगेला; उद्या होणार पुरस्कार समारंभ

0

नाशिक, ता. ७ : देशदूततर्फे प्रदान होणाऱ्या ‘देशदूत तेजस’ पुरस्कार आणि ऑनलाईन पुरस्काराचा मानकरी कोण होणार? याची उत्सुकता नाशिककरांमध्ये शिगेला पोहोचली असून उद्या सायंकाळी सहानंतर या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.

शनिवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गंगापूर रोडवरील मविप्र संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात देशदूत तेजस पुरस्काराचा शानदार वितरण सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नमस्कार! मी स्वप्नील बांदोडकर, ८ सप्टेंबर २०१८ रोजी देशदूत आयोजित तेजस २०१८ पुरस्कारासाठी मी रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड नाशिक येथे येत आहे. तुम्हीही या!

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

आपली कर्तबगारी आणि ज्ञानाच्या जोरावर विविध क्षेत्रांमध्ये कमी वयातच ठसा उमटविणाऱ्या तरुण तरुणींच्या कामाचा सर्वांना परिचय व्हावा, त्यांच्या यशकथा सर्वांसमोर येऊन त्यातून नवतरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि सोबतच या तरुणांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने दैनिक देशदूतने ‘तेजस पुरस्काराला’ सुरूवात केली आहे.

आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत दररोज एक अशा अनेक यशकथा दैनिक देशदूत आणि दैनिक डिजिटल मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. डिजिटल आवृत्तीत देशदूत तेजस पुरस्कार या लिंकवर या सर्व मुलाखती व्हिडिओसह उपलब्ध करवून देण्यात आलेल्या आहेत.

जलसा फेम नाशिककर अभिनेत्री शितल अहिरराव तेजस पुरस्कारासाठी नाशिककरांच्या भेटीला येत आहे. तुम्ही येत आहात ना!अधिक माहितीसाठी वाचत राहा देशदूत किंवा आमच्या www.deshdoot.com या संकेतस्थळाला भेट द्या'देशदूत तेजस ऑनलाईन पुरस्कारासाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. आपण आपले मत नक्की द्या. तसेच आपल्या मित्र परिवारातही ही लिंक पाठवा. https://www.deshdoot.com/tejas-poll/

Deshdoot यांनी वर पोस्ट केले बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

वाचक श्रेणीसह विविध ११ क्षेत्रांतील एकूण ४६ कर्तबगार तरुण-तरुणींना या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. या सर्वांचाच उद्याच्या समारंभात यशोचित गौरव करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रत्येक श्रेणीतील एकाची ज्युरिंच्या माध्यमातून विविध मानकांच्या आधारे निवड करून तेजस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन मतदानाच्या माध्यमातून थेट वाचकांनीही ‘डिजिटल’ तेजस पुरस्काराच्या मानकऱ्यांची निवड केली असून त्यांनाही उद्या ‘डिजिटल तेजस पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

‘देशदूत तेजस’ पुरस्काराचा ऑनलाईन मानकरी ठरविण्यासाठी दिनांक २५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत मतदान घेण्यात आले होते. त्यात नाशिक, पुणे, मुंबईसह दिल्ली, कोलकाता, लंडन, मेलबर्न, अबुधाबी, शारजा, जाकार्ता, पर्थ, सन फ्रान्सिस्को, लॉस एंजलिस, सिडनी, ब्रिस्बेन आदि जगभरातील २५६ शहरांतील सुमारे २५ हजार नाशिककरांनी मतदान केले होते.

देशदूत तेजस ऑनलाईन पुरस्कार निवडीसाठी देशदूतच्या संकेतस्थळावर मतदान सुरू आहे. कृपया आपण आपले मत नक्की द्या. तसेच आपल्या मित्र परिवारातही ही लिंक पाठवा. आपण पुढील लिंकवर मत देऊ शकता.https://www.deshdoot.com/tejas-poll/किंवा‘देशदूत तेजस’ पुरस्काराच्या ऑनलाईन मतदानासाठी लॉग ऑन करा www.deshdoot.com या संकेतस्थळावर आणि सर्वात वरच्या तेजस बॅनरवर क्लिक करून मतदान करा.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

दरम्यान ‘देशदूत तेजस’ पुरस्कार सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून ज्यांना पुरस्कार सोहळ्याचे पासेस मिळाले नसतील त्यांनी ते महात्मा गांधी रोड येथील देशदूत कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*