देशदूतवर सिन्नर विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव

0

सिन्नर, ता. १ : देशदूतच्या सिन्नर विभागीय कार्यालयाच्या 13 व्या वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

देशदूतच्या सिन्नर आवृत्तीने सिन्नर शहर आणि तालुक्याचे प्रतिबंब समर्थपणे उतरवताना तेथील अनेक सकारात्मक गोष्टी प्रकाशझोतात आणल्या. तसेच अनेक समस्यांचा जागर करून व त्याचा पाठपुरावा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे देशदूत आणि सिन्नरकरांचे एक आगळे नाते निर्माण झाले. आजच्या वर्धापनदिन सोहळ्यात  शुभेच्छांच्या माध्यमातून हे नाते अधिक दृढ झाले.

राजकीय, प्रशासन, शिक्षण, सामाजिक, कला, क्रीडा, कृषी, वैद्यकीय, उदयोग, व्यापार अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य सिन्नरकरांनी सार्वजनिक वाचनालयातील या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.

देशदूततर्फे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे, सिन्नर प्रतिनिधी विलास पाटील, अजित देसाई यांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

LEAVE A REPLY

*