Video : देशदूत संवाद कट्टा : नाशिकला पाहिजे बहुमजली पार्किंग; फेरीवाल्यांचे पुनर्वसन गरजेचे
Share
नाशिक | प्रतिनिधी
योगेश जोशी, श्रमिक सेना शहर अध्यक्ष मामा राजवाडे, संदीप जाधव, पारस लोहाडे, राजेश बेंज,
गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये स्मार्टसिटी अंतर्गत स्मार्ट रस्ते होत आहेत. स्मार्ट रस्त्यावरून मात्र अनेक नाशिककर नाराज आहेत. व्यावसायिक नाराज आहेत, काय त्यांच्या अडचणी आहेत.
पार्किंग असावी, लोकांना चालायला जागा असावी. नियोजन उत्तम केले आहे. पण कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे होते मात्र ते झाले नाही परिणामी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
नाशिक शहर फेरीवाला समितीत मी काम करतो परंतु अद्याप कुठलेही फेरीवाला झोनसाठी काम झालेले नाही. स्मार्टसिटी करा पण फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊन चालणार नाही. हक्काची जागा या लोकांसाठी उपलब्ध करून दिली पाहिजे. आधी या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा नंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे.
एक नाशिककर म्हणून अस वाटते की, स्मार्ट रोड पूर्णपणे ब्लॉक करून टाकले आहे. याचे कुठलेही नियोजन झाले नाही, त्यामुळे पाईपलाईनचे नियोजन नाही, इलेक्ट्रिक वायर पाईपलाईन वर टाकली आहे. भविष्यात या वायर बंद झाल्या तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
नाशिकच्या स्मार्टसिटी कंपनीने मनमानी कारभार करत असून शहरातील नागरिक, व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कुणाकडे जावे असा प्रश्न पडतो.
जो रस्ता अरुंद आहे त्याच रस्त्यावर स्मार्ट पार्किंग तयार करून वाहतूक कोंडीत भर टाकली आहे. रिक्षावाल्यांना नेहमीच टार्गेट केले जाते. जुन्या काळी नाशिकमध्ये टांगे होते, त्याच टांग्याच्या थांब्यावर रिक्षा उभ्या राहतात. नेहमी रिक्षा आणि आरटीओ कार्यालयाकडून नेहमीच ठराविक थांबा करण्यासाठी महापालिका पुढे येत नाही हे दुर्दैव.
नाशिकमधील छत्रपती शिवाजी गार्डन परिसरात बहुमजली पार्किंग व्हायला हवी. याच ठिकाणी तळमजल्यावर पार्किंगची सुविधा जर केली तर नाशिकचा पार्किंगचा प्रश्न मार्गी लागेल.
देशदूत विशेष संवाद कट्टा : शहरातील स्मार्ट रस्ते, वेठीस नाशिककर #Nashik #Nasik #FBLive
Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९