Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदेशदूत संवाद कट्टा: अन्नाची नासाडी

देशदूत संवाद कट्टा: अन्नाची नासाडी

सहभाग: वर्षा उगले-गामणे, मयूर भंडारी, प्रवीण पवार, अरुण नातू

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह’ आपण नेहमीच म्हणतो परंतु प्रत्यक्षात होणारी अन्नाची नासाडी हि खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते कारण अन्नाच्या नासाडीत जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. याच अनुषंगाने नाशिकच्या मधील अन्नाच्या नासाडीची परिस्थिती जाणून घेता नातू केटर्सचे संचालक अरुण नातू म्हणतात कि, हल्लीची लग्न भर अवाढव्य होत चालली आहे. आपण करत असलेला समारंभ अजून भव्य कसा दाखवता येईल या कडे जास्त लक्ष दिले जाते. आणि यातूनच जेवणात पदार्थांची यादी वाढत जाते आणि मग अन्न नासाडीला सुरुवात होते. हे कुठेतरी थांबायला हवे.

करी लीव्सचे संचालक वर्षा उगले म्हतात कि, आम्ही यावर उपाय म्हणून एक खास नाश्ता प्लेटची आखणी केली आहे. त्यात ग्राहकांना कमी दरात पोट भरेल एवढे अन्न देण्यात येते आणि त्यातून काही वाया जाण्या एवढे उरत असेल तर त्याचा वेगळा दंड ग्राहकांना भरावा लागतो. यामुळे लोकांना हव तेवढच विकत घेण्याची सवय रुजत आहे.

मयूर भंडारी म्हतात कि, अन्ना विषयीची जागृतता घरातून व्हायला हवी. अनेकदा परत मिळेल कि नाही या नादात गरज नसताना जास्तीच अन्न घेण्यात येते. त्यात विविध प्रकारचे अन्न पदार्थ असल्यामुळे बाकीच्या अन्नाची नासाडी होऊन ते वाया जाते.

प्रवीण पवार म्हतात कि, मोठ्यान पेक्षा लहान मुलांमध्ये अन्न बद्दलची जागृतता जास्त असताना दिसते. त्यांना त्या प्रकारचे शिक्षण देखील देण्यात येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या