Type to search

Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

Video : देशदूत संवाद कट्टा : ‘करोना’ला हद्दपार करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज

Share

सातपूर । प्रतिनिधी

जगाला चिंतेच्या गर्तेत लोटणार्‍या महाभयंकर करोना या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येक देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. भारतीय जनतेला या रोगापासून वाचवण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’सारख्या उपाययोजना कठोरपणे राबवणे गरजेचे आहे. मात्र, त्यातील नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा राहणार असल्याचा सूर संवाद कट्ट्यातून उमटला.

 ‘देशदूत’ आयोजित व सारस्वत बँक प्रायोजित संवाद कट्ट्यात ‘करोना व्हायरसबद्दल घ्यावयाची काळजी’ या विषयावर मान्यवरांनी विचार मांडले. यात प्रामुख्याने आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे व प्रसाद देशमुख यांनी सहभाग घेतला होता. जिल्हाधिकार्‍यांनी एकत्रित जमण्यावर घातलेल्या निर्बंधाचे स्वागत करीत हा संवाद कट्टा दिलेल्या प्रश्नावलीवर व्हिडिओच्या माध्यमातून मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.

जगाला भीतीत टाकणार्‍या ‘करोना’ आजाराला हद्दपार करण्यासाठी काळजी करण्याची गरज आहे. मात्र, जागरुकता म्हणून प्रत्येकाचा यात सहभागही आवश्यक आहे. शासनाने त्यांच्या स्तरावरुन उपाययोजना केलेल्या आहेत. मात्र त्यांनी दिलेल्या निर्देशाला आपण निमूटपणे अनुकरण करण्यातूनच आपण करोना संसर्गापासून दूर राहू शकतो. त्यासाठी नियम पाळावे लागतील.

केंद्र व राज्य सरकारने टाकलेले निर्बंधांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपल्या जबाबदार्‍या उचलत सहभाग घेणे गरजेचे आहे. ‘जनता कर्फ्यू’ हा या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी व केवळ आपल्यासाठीचा उपाय आहे. त्याकडे डोळेझाक न करता आपण सर्व सहभाग घेण्याचे आवाहन मान्यवरांनी व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!