Type to search

Breaking News देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

Video : देशदूत संवाद कट्टा : ‘स्टार्ट अप’चे फलित भविष्यात दिसेल; मान्यवरांनी मांडले मत

Share

नाशिक । प्रतिनिधी

पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या पंचवार्षिकमधील स्टार्ट अप इंडिया, स्किल डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया या योजनांमुळे देशात नव उद्योजक घडले. तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना मिळाली. मोदी यांनी पुढील पंचवार्षिकमध्ये या योजनांसोबतच सौर उर्जा क्षेत्रासह गुरवतत विस्ताराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. जगभरात सर्वाधिक झपाट्याने वाढणारे व प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता या क्षेत्रात असून, त्यादृष्टीने सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडले.

देशदूत संवाद कट्टा आयोजीत ‘मोदी सरकार पर्व दुसरे आणि युवक’ या विषयावर ते बोलत होते. शनिवारी (दि.1) झालेल्या चर्चेत अभियांत्रिकी महाविदयालायांचे प्राध्यापक पीयूष देसाई, सौर उर्जा क्षेत्रातील स्टार्ट अप उदयोजक युगंधर तुपे आणि पत्रकारीतेचे शिक्षण घेणारी विदयार्थीनी शिवानी लोहगावकर, दै.देशदूतचे जनसंपर्क व्यवस्थापक रवींद्र केडिया यांनी सहभाग घेतला होता.

केंद्रातील मोदी सरकारचे पुढील धोरण काय असले पाहिजे, याबाबत मान्यवरांनी मत मांडले. तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे न धावता उदयोजक बनावे हे पंतप्रधान मोदी यांचे धोरण होते.

तसेच, जगभरात बदलते तंत्रज्ञान लक्षात घेता स्किल डेव्हलपमेंट या विषयावर काम होणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने सरकारने स्टार्ट अप इंडिया, स्किल डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया ंया योजना अंमलात आणल्या. उद्योजक होण्यासाठी भांडवलाची गरज असते. ते उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने मुद्रा लोन ही महत्वकांधी योजना अंमलात आणली.

पहिल्या पंचवार्षिकमध्ये या योजनांचे बीजारोपण झाले असून पुढील दहा ते पंधरा वर्षात त्याची फळे चाखायला मिळतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. सरकारच्या नवीन इनिंगमध्ये या योजना अगदी तळागाळापर्यंत पोहचवण्यासाीं प्रशासनानेही प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रचंड भूक आहे.अनेकांनी नवीन प्रयोग करत त्याचे पेटंट मिळवले आहे. अशा विद्यार्थ्यांना स्टार्ट अप योजनेचा लाभ मिळायला हवा.त्यांना त्याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. नवीन सरकारने ईस्त्राइल, मालदीव व इतर देशांकडून तंत्रज्ञान हस्तांतरणावर अधिक भर दिला पाहिजे.

या नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायचे असेल तर, स्किल इंडिया योजना अधिक प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. मनुष्यबळ तंत्रकुशल झाले तर संंसाधनाचा अपव्यय होणार नाही. तसेच, जागतिक दर्जाची उत्पादनाची निर्मिती शक्य होईल. त्यासाठी प्रामुख्याने शिक्षण प्रणालीत आमुलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. नव्या सरकारने कौशल्यावर आधारित शैक्षणिक धोरणाला प्राधान्य दिले पाहिजे. जेणे करुन भविष्यातील तंत्रज्ञान व त्यादृष्टीने तंत्रकुशल मनुष्यबळ यांची सांगड घालणे शक्य होईल.

जगभरात सौर उर्जा क्षेत्राची बाजारपेठेत सर्वाधिक झपाट्याने विस्तारत आहे. मात्र, आपल्या देशात हे क्षेत्र अद्यापही दुर्लक्षित आहे. कॅनडा सारख्या देशात सौर उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

आपल्याकडे भौगोलिक व नैसर्गिक अनुकूलता असूनही सौर उर्जा व्यवस्थापनात अधिक गुंतवणूक केली गेली नाही. नवीन सरकारने सौर उर्जा क्षेत्रात गुंतवणूक करावी,. त्यातून पर्यावरणपूरक उर्जा निर्मिती करुन पर्यावणाचे जतनही करावे, शिवाय त्यामाध्यमातून रोजगाराच्या प्रंचड संधी निर्माण होतील असे मतही मान्यवरांनी या चर्चेत व्यक्त केले.


सौर उर्जा क्षेत्रात भारताला मोठी संंधी आहे. उद्योग व शेतीसाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे. सौर उर्जेचा पर्यायातून ही अवलंबता कमी करता येईल. त्या माध्यमातून रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील.

– युंगंधर तुपे


स्टार्ट अप इंडिया, स्किल डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया या योजेनेतून तंत्रकुशल मनुष्यबळ तयार होत आहे. सरकारचे शैक्षणिक धोरण त्या अनुषंगाने असले पाहिजे.कौशल्य विकासाला शिक्षण पध्दतीत समाविष्ट करणे गरजेचे आहे.

– पीयूष देसाई


मुद्रा लोन योजनेचा लाभ ग्रामीण भागातील तरुणांना मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यांना जर योग्य वेळी अर्थपुरवठा मिळाला तर ग्रामीण भागातील गूरवत्तांना विकसित करुन नव्या पिढीचे उद्योजक घडतील.

– शिवानी लोहगावकर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!