Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

LIVE : देशदूत संवाद कट्टा : बदलताहेत वाचन संस्कृतीचे ‘ट्रेंड’

Share

नाशिक | प्रतिनिधी

आजच्या डिजिटल युगातील युवक वाचन संंस्कृतीपासून दूर चालले असल्याची बोंब खरी नसून, या मुलांच्या वाचनाच्या पद्धती बदललेल्या आहेत. त्यांचे वाचन ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने त्याच्या या सवयींकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज असून, मुलांनीही आपल्या वयाच्या अनुषंगाने येणार्‍या विषयांचेच वाचन करण्यावर भर द्यावा, असा सूर देशदूत संवाद कट्ट्यातून उमटला.

देशदूतच्या वतीने ‘आजच्या युगातील मुलांमधील वाचन संस्कृती’ या विषयावरील संवाद कट्ट्यात तरुणांनी आपले विचार मांडले. यात प्रामुख्याने शर्वरी भोसले, प्राजक्ता नागपुरे, चारुल बागमार, छाया जाधव, प्रणव चावक, हर्ष ठक्कर, ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सहभाग घेतला होता. तरुणांच्या वाचन पद्धती बदललेल्या आहेत. बदलाची अपेक्षा करताना मोठ्या प्रमाणात युवकांच्या पसंतीला वाव नसल्याने ते आपल्या आवडीचे विषय ऑनलाईन अथवा डिजिटल पद्धतीने वाचतात.

आजचे युग मिश्किल युग आहे. मुले वाचतात. त्यांच्या वाचनाच्या पद्धती वेगळ्या. त्यांना स्क्रीनवर वेगवेगळ्या पद्धतीचा मजकूर हवा आहे. त्याच्याशी निगडीत त्यांना भावेल, त्यांच्या आयुष्याशी निगडीत, त्यांच्या जीवनावर छाप पाडेल, असा मजकूर वाचण्याची तयारी आहे. त्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची तयारी आहे. ती वाचताहेत, आपण त्यांना काय देतोय, याकडे प्रत्येकाने जागरुकपणे बघणे गरजेचे आहे, असा सूर या चर्चासत्रातून उमटला.

या चर्चासत्रातून तरुणाईने वर्तमानपत्र अथवा पुस्तकांना हातात घेऊन वाचण्यापेक्षा डिजिटल पुस्तकांचे आपल्या आवडीनुसार वाचन करण्याची सवय बळावलेली आहे.

तरुणाईला डिजिटलच्या माध्यमातून पुस्तकेच नव्हे तर लेख ब्लॉग, चॅटिंगच्या माध्यमातून सातत्याने वाचनाचे वेड लागलेले आहे. या तरुणाईला गरज आहे ती योग्य- अयोग्य मजकुराची सवय लावण्याची. वयाच्या तुलनेते योग्य नसलेल्या विषयांना हात न लावण्याची बंधने प्रत्येकाने स्वत:च अंगी बाळगणे गरजेचे असल्याचे मत तरुणांनी चर्चेत व्यक्त केले.

…या संपूर्ण चर्चा सत्राचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!