Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

Video: देशदूत संवाद कट्टा : जाणून घ्या; आर्थिक नियोजन आणि त्याचे फायदे

Share

नाशिक | प्रतिनिधी

बोली भाषेत ‘अर्थ’ म्हणजे पैसा. असं म्हणतात की ‘अर्थ’ असेल तर जीवनाला अर्थ आहे. पैशाचं जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात उदरनिर्वाहासाठी प्रत्येकजण काहींना काही उद्योग करत असतो खर्च करावा हेही महत्वाचे असते.

सर्वसाधारणपणे काही पैसे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावा लागतो तर उरलेला पैसा हा गुंतवणुकीसाठी ठेवला जातो. आपल्याकडे बऱ्याचदा पैसे कमावण्यासाठी जेवढे महत्व दिले जाते तेवढे त्याचे व्यवस्थापन/नियोजन (Financial Planning) करण्यास दिले जात नाही.

त्याकडे आपण कानाडोळा करतो. नेहमीच डोळसपणे केलेली गुंतवणूक हि किफायतशीर ठरते. अनेकांना याची अर्थ नियोजनाची (Financial Planning) जाणीवसुद्धा नसते. बँक मधील मुदतठेवी, पोष्टातल्या योजना किंवा विमा गुंतवणूक यापलीकडे बऱ्याच लोकांना काहीही माहित नसते.

याचे मुख्य कारण म्हणजे अर्थसाक्षरतेचा अभाव असणे होय. झटपट श्रीमंत होण्याची जादूची कांडी सद्य जगात तरी अस्तित्वात नाही. त्यासाठी अर्थनियोजन (Financial Planning) हाच एकमेव पर्याय आहे.

सहभाग : प्रसन्ना कुलकर्णी, उन्मेष कुलकर्णी, रुपाली कुलकर्णी, रघुवीर अधिकारी, मुकेश चोथानी, मिनल लुणावत, सीए

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!