Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

LIVE : देशदूत संवाद कट्टा : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ”विशेष चर्चा”

Share

नाशिक | प्रतिनिधी

मानवी जीवनातील बदलत्या स्थित्यंतरांमध्ये तंत्रज्ञशनाचा वापर महत्याची भूमिका बजावत आहे. येणार्‍या काळात प्रत्येक विकासात तंत्रज्ञानाचा सहभाग राहणार आहे. भारतीय युवकांमध्ये कमालीची गूणवत्ता आहे. मात्र त्यांच्या कल्पनांना मुर्त स्वरुप देण्यासाठी शालेय स्थरावरुन प्रोत्साहन देणार्‍या अभ्यासक्रमांची गरज असल्याचा सूर ‘टेक्नॉलॉजी डे’ निमित्त आयोजीत देशदूत संवाद कट्टातून उमटला.

दैनिक देशदूत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद कट्टा’ या चर्चासत्रात तंत्रज्ञान’ या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्योजक ज्योतीप्रकाश बेहेरा, पेटेंटचे प्रसारक रवी शास्त्री, स्पेस एज्यूकेटर अपूर्वा जाखडी, डिजीटल टेक्नॉलॉजीचे तज्ज्ञ ऋतूराज कोहोक, देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मान्यवरांनी तंत्रज्ञानाच्या गरजेचा पूरस्कार करताना येणार्‍या काळात आखी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असल्याचे सांगितले. पाल्यांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण करुन त्यांच्यात कल्पकता वाढवण्याचे काम पालकांनी करण्याची गरजही यावेळी मान्यवरांनी विषद केली. तंत्रज्ञानाचा वापर आज पावलोपावली मानवाची गरज झालेला आह. त्याचा सकारात्मक उपयोग करुन विधायक कामांसाठी वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

तंत्रज्ञान जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. प्रत्येक कामात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यातून केवळ सोयीस्कर हा भाग नाहीतर जीवन सूलभ करण्यावर नागरीकांचा भर आहे. विकसित झालेल्या तंत्रज्ञानात येणार्‍या काळत आणखी मोठ्या प्रमाणात भर पडण्याची शक्यता आहे. मुलांच्या ज्ञानाची क्षमता मोठी आहे. त्यांच्यातील गुणवत्तांचा विकासाच्या दृष्टीने प्रयत्नांची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले.

उद्योग व शिक्षणाची सांगड घालणे गरजेचे आहे. मुलांच्या क्षमता मोठ्या आहत. तयांच्या संकल्पनांना पालक दाबून टाकतात. त्याची सांगड घालण्यासाठी शिक्षणात त्याचा समावेश असणे गरजेचे आहे. मुलांनी पराभवातून शिकण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे.
– ज्योतीप्रकाश बेहेरा (उद्योजक)

तंत्रज्ञानाचा वापर आज सर्वव्यापी झालेला आहे.हे चित्र पूढील काळात आणखी दिसणार आहे. मुलामध्ये कल्पकता आहे. केवळ त्याना संदी व प्रोत्साहन देण्याची गरज आहे.  -ऋतूराज कोहोक (डिजीटल टेक्नॉलॉजीचे तज्ज्ञ)

स्पेस तंत्रज्ञानून आपण बर्‍याच गोष्टींची माहीती घेतो. सर्वसामान्यांच्या जीवनशैलीसाठी त्याचा वापर होईत तेव्हा खरा तंत्रज्ञानाचा उत्सव होईल. शेतकरी बांधवांना निसर्ग चक्रातील बदलांचे ज्ञान वेळेपूर्वी दिल्यास त्यादृष्टीने शेती उत्पादनांचा विकास करणे व काळजी घेणे शक्य होणार आहे.
-अपूर्वा जाखडी (स्पेस एज्यूकेटर).

संशोधन हे मोठे काम आहे. इनोव्हेशनसाठी लागणारी लढत फार कमी झालेली आहे. इनोव्हेशन हा सूंदर इव्हेंट आहे. मुलांच्या कल्पकता मोठ्या प्रमाणात वाढू लागलेल्या आहेत.आपण संशोधनाची कास धरुन नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावून त्याचे पेटेंट केले तर जीवनभर त्याची रॉयल्टी मिळणार आहे.
– रवी शास्त्री (पेटेंट प्रसारक)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!