Type to search

Breaking News देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

LIVE : देशदूत संवाद कट्टा : नरेंद्र मोदी यांच्यात नेतृत्वगुण म्हणूनच मोदींना कौल

Share

सहभाग : प्राध्यापक सिंधेकर, सुनील भायबंग, विक्रांत कुलकर्णी

नाशिक | प्रतिनिधी 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाट नव्हती. कुठेतरी सत्ता परिवर्तन होईल असे वाटत होते. मात्र, जनतेने कौल मोदींनाच म्हणजेच भाजपच्याच पारड्यात पाडली. लोकांच्या मनात मोदी सरकारबाबत काय भावना असतील?  चौकीदारावरून काहूर माजले. सर्जिकल स्ट्राईकवरून विरोधकांनी पुराव्याची भाषा केली. जगभरात या घटनेचे वार्तांकन झाले. मात्र, जनता विकास बघत होती. पाच वर्षांत काय बदल झाले हे त्यांनी अनुभवले होते. भारताने केलेल्या कारवाईच्या समर्थनार्थ जगातील बलाढ्य देश भारताच्या पाठीमागे उभे राहिले. पाकीस्तानला नमते व्हावे लागले होते हे जनता विसरली नाही असा सूर देशदूत संवाद कट्ट्यात उमटला.

या शनिवारच्या कट्ट्यासाठी प्राध्यापक सिंदेकर, नाशिक सिटीझन फोरमचे सुनील भायबंग आणि सीएस असोसिएशनचे विक्रांत कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी मोदी का निवडणून आले याबाबतचर्चा करताना सिंडेकर म्हणाले की,  मोदीमध्ये जनतेला त्यांचे स्वप्न दिसून आले. अल्पसंख्यांकांचे सपुष्टीकरण करत कॉंग्रेस निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, कॉंग्रेसचा करिष्मा संपला आहे. राष्ट्रवादाची ओळख आता देशवासियांना कळून चुकली आहे. त्यामुळे मोदींना जनतेने कौल दिला. जनता इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनाही एका वेगळ्या नजरेने बघायची. त्यामुळेच त्यावेळी भाजपला गारद करून कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत तेव्हा जनतेने दिले होते.

सुनील भायबंग म्हणाले की, गेल्या इलेक्शनच्या वेळी मोदीलाट मोठी होती. यंदा मात्र तसे नव्हते, पण लोकांना पंतप्रधान म्हणून कोण हवे हे कळून चुकले होते. कॉंग्रेसकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नव्हता. त्यांनी घोषितही केला नाही. त्यामुळेच मोदींना जनतेला कौल दिला. मोदी सरकारने अनेक योजना आणल्या होत्या. उडानसारख्या योजनांनी विमानसेवा सुरु झाल्या. अनेक शहरे आज हवाई उड्डाणांनीजोडली गेली आहेत. त्यामुळे मोदी यांच्याविषयी जनता सकारत्मक होती.

विक्रांत कुलकर्णी यांनी सांगितले की, मोदीमध्ये प्रखर नेतृत्व आहे. त्यांच्या कामाची पद्धती वेगळी आहे. मोदी १६-१६ तास काम ते करतात. याआधी अनेक योजना आल्या होत्या मात्र त्यांची अंमलबजावणी होत नव्हती. मोदी सरकारच्या काळात वेगळ्या योजना आल्या असे काही नाही. योजना जुन्याच आहेत, फक्त त्यांची योग्यप्रकारे अंमलबजावणी प्रभावी केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!