Video : नाशिक होणार ‘आयर्नमॅन्स’ची ‘पंढरी’; ‘देशदूत’च्या विशेष संवाद कट्ट्यात यशोगाथा कथन

Video : नाशिक होणार ‘आयर्नमॅन्स’ची ‘पंढरी’;  ‘देशदूत’च्या विशेष संवाद कट्ट्यात यशोगाथा कथन

नाशिक | प्रतिनिधी 

दृढ निश्चय, कुशल मार्गदर्शन व कठोर परिश्रमातून आपण प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करु शकतो हे नाशिकच्या चार ‘आर्यनमन्स’ने आपल्या कर्तूत्वातून सिध्द केले आहे. नाशिककरांमध्ये मोठी क्षमता आहे; मात्र प्रत्येकाने ती पात्रता मिळवण्याच्या उद्देशाने पुढे पूढे येण्याचे आवाहन ही डॉ. रवींद्र सिंघल यानीं केले. देशदूतच्या विशेष संवाद कट्टयात आज ते ‘नाशिकच्या आर्यनमॅन प्रवास’ या विषयावर बोलत होते.

यावेळी नाशिकच्या पाच आर्यनमॅन्सने त्यांना ऑस्ट्रेलियातील खडतर समजल्या जाणाऱ्या आर्यनमॅन स्पर्धेतील अनुभव कथन केले.  यावेळी गेल्या वर्षी आर्यनमॅनचा किताब आपल्या नावे केलेल्या डॉ. रवींद्र सिंगल यांनीदेखील त्यांचे अनुभव मांडले.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी असलेली स्पर्धा नाशिककरांसाठी इतिहास घडवणारी ठरली आहे. कारण आजपर्यंत नाशिकने आठ आर्यनमॅन दिले आहेत.

यंदा नाशिकच्या चौघांनी ऑस्ट्रेलियाच्या बसल्टन येथे पार पडलेल्या स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी केली. यामध्ये  प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया, डॉ.  अरुण गचाले व नाशिक सायकलीस्टचे सदस्य किशोर घुमरे असे चौघा खेळाडूंचे नावे आहेत. आज देशदूतच्या विशेष संवाद कट्ट्यात ते संबोधित करत होते.

यंदाच्या घुमरे यांनी 15 तास 11 मिनिट आणि 22 सेकंदात, प्रशांत डबरी यांनी 16 तास 20 मिनिट 33 सेकंदात, महेंद्र छोरीया यांनी 16 तास 20 मिनिट आणि 41 सेकंदात, तर डॉ. अरुण गचाले यांनी 16 तास 56 मिनिट आणि 9 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली.

या स्पर्धेदरम्यान थंड पाण्यात पोहणे, प्रतिरोध करणार्‍या वार्‍याचा सामना सायकलिंग आणि रनिंग करावी लागते. डॉ. गचाले यांनी शेवटच्या क्षणी अतिशय वेगाने धावून ही स्पर्धा चार मिनिट आधी पूर्ण करत बाजी मारली. किशोर घुमरे, प्रशांत डबरी व महेंद्र छोरीया यांनी मागील वर्षी कोल्हापूर येथे हाफ आयर्न मॅन स्पर्धा यशस्वी पूर्ण केली होती. संवाद कट्ट्यात कुटुंबांची कशाप्रकारे मदत झाली याबाबतचेदेखील अनुभव या कट्ट्यात शेअर केले.

नाशिकच्या वातावरणामुळे प्रभाव

नाशिकचे वातावरण खूप छान अल्हाददायक असल्यामुळे स्विमिंग, सायकलिंग ,रनिंग याचा सराव चांगल्या प्रकारे झाला. नाशिक मध्ये रनिंग ,सायकलींचे ग्रुप असल्यामुळे ग्रुप सोबत चांगल्याप्रकारे सराव नियमित होत होता. तसेच आपल्या आजूबाजूला धरणे असल्यामुळे ओपन वॉटर स्विमिंगचा सराव चांगला झाला असल्याची प्रतिक्रिया या खेळाडूंनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com