Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

Video : देशदूत संवाद कट्टा : शिक्षण प्रणालीतील उपक्रमशिलता मुलांचा वाढवते उत्साह

Share

देशदूत संवाद कट्टा सहभाग : निवेदिता भालेराव, मैथिली गोखले, भूपेंद्र शुक्ला, प्रशांत पगार, लक्ष्मीकांत संत

नाशिक । प्रतिनिधी

शिक्षकांमध्ये काहीतरी वेगळे करण्याची धडपड असेल तर ती विध्यार्थ्यांमध्ये पोहोचते. शाळां व विद्यार्थी घडवण्याची प्रक्रिया सोपी नसली तरी अशक्य नाही. शिक्षकाकडे केवळ इच्छा शक्तीे असली पाहीजे मुलांना नवनविन प्रणालीतून शिक्षण दिले तर मुले आनंदाने सहभाग घेण्यासाठी पूढे येतात.

यात पालकांनीही सहभाग घेत आपल्या पाल्यांसांठी काय केल तर मुलांमध्ये चांगले बदल घडू शकतील याचा विचार करणेे गरजेचे आहे. केवळ पूस्तकी ज्ञान नव्हे तर उपक्रमशिलतेतून दिले जाणारे ज्ञान केवळ आत्मसात होत नाही तर त्यांचे सविस्तर आकलन होत असल्याने मुलांनाही ते भावत असल्याचा सूर देशदूत संवाद कट्यातून उमटला.

समाजातील विविध विषयांवर संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात येणार्‍या ‘देशदूत संवाद कट्टा’त ‘उपक्रमशिल शिक्षण, काळाची गरज’ या विषयावर मान्यवरांनी आपले विचार मांडले. यात निवृत्त ज्येष्ठ शिक्षीका मैथिली गोखले, आनंद निकेतनच्या निवेदिता भालेराव, चांदोरीच्या रयत शिक्षण संस्थेचे ग शिक्षक प्रशांत पगार, मनपा शाळेतील शिक्षक भूपेंद्र शुक्ल व लक्ष्मीकांत संत, देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सहभाग घेतला होता.

शाळांच्या क्रमिक अभ्यास क्रमात मुलांना गोडी निर्माण करण्यासाठी पारंपारीक पद्धतीचा अवलंब केल्यास त्याला मुले कंटाळतात. मात्र त्यात वेगळेपण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना उत्साह वाढत असल्याचा सूर या कट्टातून उमटला. या उपक्रमशिलता जोपासण्यासाठी शिक्षकांनाही वेगळे प्रयत्न करावे लागतात.

विद्यार्त्यांसोबतच पालकांचाही विश्वास त्यात वाढवावा लागत असल्याने त्यांचा सहभाग महत्वाचा होत आहे. उपक्रमांच्या तयारीसाठी शाळेच्या वेळेे व्यतिरिक्तचा वेळ देणे भाग पडत असते.यासाठी शिक्षकांना तयार राहणे गरजेचे असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले. शिक्षकांवर असलेल्या अतिरिक्त कामांचा बोझा त्यांना उपक्रमशिलतेपासून दूर नेत असल्याची भावना प्राकर्षाने पूढे आली.


विद्यार्थ्यांना शिक्षण देणे म्हणजे मुलांचे ‘मन,मेंदू व मनगट ’मजबूत करणे हे खरे शिक्षण. ते केवळ पूस्तकी ज्ञानातून येणार नसून, त्याला मैदानी खेळांसोबतच उपक्रमशिलतेची जोड देणे गरजेचे आहे.

  • लक्ष्मीकांत संत

मुलांना नाविन्यता दिली तर ते पटकन आत्मसाद करतात. त्यााचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. यासाठी केवळ शालेय शिक्षणावर अवलंबून राहता येणार नाही त्यासाठी घरातून व परिसरातील वातावरणातही बदल असण गरजेचे आहे.

  • प्रशांत पगार

मुलांना शिक्षणाबाहेरचे नाविन्य देता आले पाहीजे. यासाठी मुलांच्या गुणवत्तेनुसार वेगवेगळे ग्रुप करुन त्यांना त्यात सामावून घेत उपक्रम राबविले. यामुळे प्रत्येक मुलगा सहभागी झाल्याने त्यांचा उत्साही वाढला..

  • भूपेंद्र शुक्ल

विद्यार्थी हा नेहमी उत्सूक असतो. त्याच्या या उत्स्ूकतेला दिशा देण्याचे काम उपक्रमशिल शिक्षणातून घडायला हवे. या क्षिकांची भूमिका ही खुप महत्वाची असते. त्याबरोबरच पालकांचा सहभाग असल्यास मुलांना खरातून देखिल प्रोत्साहन मिळू शकते.

  • मैथिली गोखले

हल्लीची मुले प्रश्न विचारायला पूढे येताना घाबरत नाहीत मुलांचे शिक्षकांशी नाते निर्माण होणे गरजेचे आहे..आरपले पणा व आत्मविश्वास वाढणे गरजेचे आहे. एकत्रित काम करण्याची पध्दत वाढली पाहीजे. .

  • भूपेंद्र शुक्ल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!