Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

Video: देशदूत संवाद कट्टा: पर्यावरणपूरक उत्सव साजरे व्हावेत..

Share

नाशिक | प्रतिनिधी

विविध सण साजरे करण्यात पर्यावरणाची जोड महत्त्वाची आहे. मात्र सणांच्या स्वागतात पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत असल्याने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाशिककडे लोक उदाहरण म्हणून बघतात. नशिककरांना पुढाकार घेणे गरजेचे आहे. लहान लहान गोष्टींचा वापर करून निसर्गाचा आदर, निसर्गाशी प्रेम राखून सण कसे साजरे करू शकतो. त्यातून उद्दिष्टही साध्य होणार आहे. गणपती विसर्जन करण्यासाठी नदीवर न जाता घरातील बादलीत करण्याकडे कल वाढत आहे.

आपणही हा सण निसर्गाशी मैत्रीपूर्ण करून साजरा करण्याचा संकल्प केला पाहीजे. हा गणेशोत्सव ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषणरहीत करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. आनंद निश्चित घ्या, त्याचबरोबर पर्यावरणाची काळजी घेऊन, पर्यावरण जतनासोबतच नागरी जीवनमानावर त्याचा विपरित परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेत साजरा करणे गरजेचे असल्याचा सूर या चर्चेतून उमटला.

‘देशदूत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘देशदूत संवाद कट्टा’ उपक्रमात माहिती अधिकार विभागाच्या अधिकारी माधुरी देशपांडे, नाक- कान- घसा तज्ज्ञ डॉ. श्रीया कुलकर्णी, मानव उत्थान मंचचे जसबिरसिंग, मानसोपचार तज्ज्ञ अमोल कुलकर्णी, देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले हे होते. चर्चेत पुढे आलेल्या विषयात पर्यावरणाच्या रक्षणासाठीं खर्‍या अर्थाने 2009 साली सुरुवात करण्यात आली होती.

त्यावेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी युवकांना नदी प्रदूषण रोखण्याच्या विषयावर काम करण्यासाठी पुढे आणले गेले. नंतरच्या काळात वातावरणाच्या र्‍हासाकडे लक्ष वेधले. आज पर्यावरणाच्या जतनाबद्दल मोठे काम होणे गरजेचे असल्याचा सूर यावेळी उमटला. सणावारांच्या निमित्ताने पर्यावरणपूरक काम करताना समाजाला प्रबोधन करण्याच्या दृष्टीने काम केल्यास येणार्‍या पिढीला देण्याचे काम होणार असल्याचा सूर यातून उमटला होता.

ध्वनी प्रदूषणाची 60-65 डेसिबलच्या मर्यादेवरील ध्वनी हा मानवाच्या शरीरावर विपरित परिणाम करीत असते. यातून कानाचे आजार संभवतातच, मात्र त्यासोबतच हृदयरोगी व मानसिक रुग्णांच्या संख्येतही प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वास्थ्यावर दुष्परिणाम करणार्‍या ध्वनी प्रदूषणावर स्वत:च बंधने घालणे गरजेचे आहे.
-डॉ. श्रीया कुलकर्णी, शाडू गणेशमूर्ती कार्यशाळा

समाजाचे देणे लागतो ही भावना रुजणे गरजेचे आहे. यातूनच सर्वत्र पर्यावरण जतनाबद्दल बोलले जाते, मात्र वेस्टमधून बेस्ट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यासोबतच आपल्या देखाव्यातून समाज प्रबोधनाचा संदेश देणे गरजेचे आहे. त्यातून लोकांच्या विचारांना दिशा मिळणे सोपे होते व आपले संस्कारही रुजवणे शक्य होत असते.
-माधुरी देशपांडे, सामाजिक देखावा

नाशिकातून सूरू होणार्‍या पर्यावरण पूरक मोहीमेचे देशभरातून अवलंबन केले जाते. त्यामुळे आपली जबाबदारी वाढलेली आहे. नदी प्रदूषण, पर्यावरण जतनासोबतच आता मानवी जीवनमान आबादित राहण्यावर पर्यावरण र्‍हासाचा होणारा परिणाम लक्षात घेउन यावर काम करण्याची गरज आहे. यापूढे आता गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
-जसबिर सिंग, मानव उत्थान मंच

शाडूमाती ही हजारो टनाने येते. येणार्‍या काळात मातीच्या खाणीवर मोठी नवी समस्या तयार होणार आहे. त्याला पर्याय म्हणून साधारण काळी माती वापरून गणपती बनवणे त्यात बीजांची पेरणी करणे व त्या गणपतीच्या परसातील विसर्जनातून नव्या झाडांच्या अंकुरण्याचे बीज रोवणे यातून खर्‍या अर्थाने पर्यावरणाचे जतन होणार आहे.
-वैभव देशपांडे, अंकुर गणेश

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!