Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा मुख्य बातम्या राजकीय

देशदूत संवाद कट्टा : कर्जमाफी नको, हमीभाव द्या!

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, वातावरणात झालेल्या अमुलाग्र बदलामुळे शेती करणे मोठे जिकरीचे झाले आहे. कर्जमाफी, अनुदान मिळावे यासाठी जाचक अटी लादल्या आहेत. कर्जमाफी, अनुदान मिळाले नाही तर चालेल पण पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे. हमीभाव मिळाला तर शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळेल, परिणामी शेतकरी स्वावलंबी होईल. कर्जमाफी, कर्ज थकवणे असे व्हायला नको. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली की, सवय लागते आणि बँकाची वाटचाल डबघाईकडे चालली जाते. यामुळे हमीभाव मिळावा असा सूर देशदूतच्या राजकीय विशेष कार्यक्रम ‘विधानसभेचा रणसंग्राम’ या चर्चासत्रात  निघाला.

कट्ट्यासाठी गणेश जाधव, भास्कर पिंगळे या शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कट्ट्याचे सूत्रसंचालन देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी केले.

शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बघता सरकारने पैसे खात्यावर न टाकता, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी विविध योजना राबविल्या पाहिजेत. यामध्ये आरोग्य योजना, शेती पूरक जोडधंद्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

उद्योगांना जर २४ तास वीज मिळते, तर ज्या ठिकाणी बागायती क्षेत्र आहे तिथे २४ तास वीज मिळाली तर विजेअभावी शेती बारगळणार नाही. अनेकदा हक्काचे पाणी जवळ असून शेतकरी टंचाईला सामोरे जातो. याठिकाणी पाण्याची व्यवस्था बघितली गेली पाहिजे.

शेतीच्या विकासासाठी उपाययोजना करण्यासाठी आगामी सरकारने शेतीवर आधारित संशोधनावर भर दिला पाहिजे. पीकविमा योजना प्रभावी योजना राबवल्या गेल्या पाहिजेत.

गेल्या दहा वर्षांपासून जून महिन्यात नाशिकमध्ये पाऊस पडत नाही. त्यामुळे नाशिकमधील खरीप हंगाम एक महिना उशिरा झाल्यामुळे रब्बीदेखील उशीर होतो. हे सरकारने बघितले पाहिजे. कांद्याची अडचण गेल्या वर्षी रब्बीचे नियोजन योग्य न झाल्याने शेतकऱ्याचे नियोजन कोलमडले आहे.

यामुळे शेतकऱ्याचे नियोजन सरकारने परिस्थिती अनुरूप केले पाहिजे. डावा कालवा, उजवा कालवा तसेच पाण्याचे आरक्षण असेल तिथे ते हक्काचे पाणी शेतकऱ्यांना लवकर मिळाले पाहिजे.

बाजारभाव शेतकरी न ठरवता व्यापारी ठरवतात. त्यामुळे शेतकऱ्याला व्यापारी सांगेल तो बोली लावेल तसाच बाजारभाव विक्री करावा लागतो; हे चित्र बदलले पाहिजे.

सध्याची शेतीची अवस्था पाहता येणारी पिढी शेतीकडे वळण्याची शक्यता कमी आहे. शेतीला पूरक जोडधंदा सुरु झाला तर तो होऊ शकतो, मात्र, शेतीसाठी लागणारे भांडवल, बाजारभाव आणि अनियमित वातावरण यामुळे शेतीत मोठी रिस्क आहे. म्हणून आगामी पिढी शेतीकडे वळण्याची शक्यता कमीच आहे. शेतीसाठी लागणारी औषधे, खते खाद्य यांच्या किंमती भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिक कचाट्यात दरवर्षी अडकतो; हे चित्र बदलले पाहिजे.

 

 

 

#DeshdootFBLive #vidhansabha2019 राजकिय कट्टा : काय आहेत शेतकरी वर्गाच्या अपेक्षा

Posted by Deshdoot on Tuesday, 15 October 2019

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!