Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

देशदूत संवाद कट्टा: मुलांचे स्वच्छंद बालपण देण्याची जबाबदारी पालकांची

Share

देशदूत संवाद कट्टामध्ये मान्यवरांनी दिला आठवणींना उजाळा

नाशिक | प्रतिनिधी

मुलांच्या आयुष्यात बागडणे खेळणे हे महत्वाचे अंग आहेत. आजच्या बदलत्या जिवनसंस्कृतीत पालकांच्या ओझ्यातून मुलांचे बालपण हरवताना दिसून येत आहे. मैदानी खेळावर बंधने, स्वच्छंद वातावरणाला लगाम, मोबाईल, इतर गॅझेटसचा सरसकट वापर, यातून मुले एकलकोंडी होवू लागलेली आहेत. मुलांना त्यांचे खरे रम्य बालपण देण्याची ते जपण्याची खरी जबाबदारी ह पालकांचीच असल्याचा सूर देशदूत संवाद कट्टातून उमटला.

 

देशदूत तर्फे आगामी बालदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘रम्य ते बालपण’या विषयावर संवाद कट्टाचे आयोजन करण्यात आले होते. या कट्टात अभिनव विद्यामंदिरच्या मख्याध्यापिका मिनाक्षी गायधनी, देशदूतचे जाहीरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, बालरोगतज्ज्ञ डॉ. पंकज गाजरे, क्रीडा प्रशिक्षक अविनाश खैरनार, बिटको कॉलेजच्या प्रा.ऋतूजा नाशिककर, देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यात लहानपणाच्या खेळांचे प्रकार, त्यांचे स्वरुप, त्यांचे प्रकार, मूलांच्या पार्ट्या, त्यासाठीचे घरगूती खादयपदार्थ यातून विविध आठवणी जागवल्या. यात आजच्या जीवनशैलीशी जोड देताना त्यांनी पालकांना मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरवले आहे. मुलांवर आपल्या बालपणाचे ओझे लादत असतात. आपल्याला बालपणात जे मिळाले नाही ते देण्याच्या प्रयत्नातून अनावश्यक ओझे लादताना दिसतात. यात मुलांचे बालपणच हरवताना दिसून येत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

आजचे पालक मुलांची अती काळजी घेताना दिसून येत आहेत.स्वास्थ्याच्या दृष्टीने चारचौकांमध्ये मिसळू देत नाहीत.मैदानी खेळातून मानवी संबंधाचे धागे विणली जातात. यापासून मुले वंचित राहत आहेत. पर्यावरणातील प्रदूषणातून विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याला साथ मिळत आहे ती सकस आहाराऐवजी ‘जंंक’ फूडची.पालकांनी या बाबत जागरुकता बाळगणे गरजेचे आहे ते मुलांवर आपल्या आपेक्षांचे ओझे लादत असल्याचे मान्यवरानी सांगितले.मुलांना मैदानी खेळाबाबत पालकच ठरवतात.

त्यात त्यांचा मातीशी संबंध येत नाही त्यामुळे मुलांमध्ये काटकता कमी होऊ लागलेली आहे. पूर्वीच्या पारंपरीक खेळांची जागा व्हिडीओ गेमने घेतली आहे. पूर्वीच्या संयुक्त कुटूंब व्यवस्थेत ज्येष्ठांच्या माध्यमातून मुलांवर संस्कार केले जात होते. वयाच्या अडीच वर्षातच शाळेत टाकले जाते. खेळाऐवजी विविध क्लासच्या माद्यमातून मुलांवर आपेक्षांचे ओझे लादले जाते. पालकांनी मुलांवरील दबाव काढून त्यांना स्वच्छंद जगू देण्यासाठी पूढे येणे गरजेचे आहे. पालकांनी स्वत:ला त्यात न पाहता मुलांशी संवाद साधताना त्यांच्यात सकारात्मक उर्जा भरण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सूर देशदूत संवाद कट्टातून उमटला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!