LIVE : देशदूत संवाद कट्टा : बदलती शिक्षण पद्धती

0

नाशिक | देशदूत संवाद कट्टयावर या आठवड्यात बदलत्या शिक्षण पद्धतीवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी याप्रसंगी संवाद साधला. विद्यार्थ्यांना पडणारी प्रश्न, पालकांची भूमिका, विद्यार्थ्यांना मिळणारी मोकळीक यावर चर्चा करण्यात आली.

विद्यार्थ्यांवर अनेक प्रकारे दबाव नकळत येतो. त्यातून सावरण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मिळून यावर तोडगा काढला पाहिजे. मुलांना बोलण्यासाठी भाग पाडले पाहिजे यातून त्यांना अभिरुची असलेल्या क्षेत्रात त्यांना करीयरच्या उघड्या होतील. आणि पुढे जाऊन विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरीदेखील करतील.

ताज्या घडामोडी व्हॉट्सअँपवर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा

आजची शिक्षण पद्धती शहर आणि ग्रामीण भागात सारखीच आहे. ग्रामीण भागात परिस्थिती काहीशी वेगळी असते. यासाठी ठराविक असा वेगळा अभ्यासक्रम दिला पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुरेशी मोकळीक मिळाली पाहिजे.

शिक्षणाचे धोरण प्रभावी राबविले गेले पाहिजे. मुलांनी परीक्षार्थी न होता एक करियरची आणि आनंदी आयुष्याची वाट धरावी असा सूरच या चर्चासत्रातून निघाला.

चर्चासत्राचा संपूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा

LEAVE A REPLY

*