Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : आयुष्य जगताना ज्यातून समाधान व आनंद मिळते तेच खरे ‘करीअर’

Share

नाशिक । प्रतिनिधी

जगाच्या पाठीवर प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे.त्यामुळे आपल्या क्षमता सिध्द केल्या तरच टिकाव लागू शकणार आहे. त्यासोबत सूरू झालेल्या ‘मार्क बेस्ड’शिक्षण प्रणाली गतीमान झालेली आहे.

निकालतून आपेक्षा पूर्ती झालेली नसली तरी हा आयुष्याचा शेवट नाही खरे आयुष्य येथूनच सूरू होत असते. प्रत्येकाने करिअर म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे.

करीअर म्हणजे चांगले आयुष्य जगताना ज्यातून समाधान व आनंद मिळते तेच खरे करीअर होय.यातून आपल्या करीयरची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचा सूर देशदूत संवाद कट्टांतून उमटला.

दै. देशदूत च्या वतीने दर शनिवारी ‘संवाद कट्टा’आयोजित केला जातो. यंदाच्या या संवाद कट्टात ‘विद्यार्थ्यांचे करीअर’ यावर चर्चा करण्यात आली.

या चर्चेत रामानुजम अकादमीचे हास भामरे,सूदर्शन अकादमीचे संचालक हर्षल अहिराव, श्रीराम इंजिनिअरिंग क्लासेसचे कैलास दसले, मानस शास्त्र तज्ज्ञ सरिता पगारे, निट परिक्षेत यशस्वि झालेल्या सलील संकलेच्या यांचया मातोश्री कल्पना संकलेचा, एमबीए मध्ये यशस्वी झालेला प्रथमेश बाडोले, व दै. देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले हे होते.

मुलांनी दहावी बारावी परिक्षांंच्या निकालानंतर मुलांना करिअरच्या माना अभावी चुकिच्या दिशेला वाटचाल सूरू होते त्यातून त्यांच्या पूढच्या आयुष्याला दिशा राहत नसल्याने मुलांच्या वाट्याला नैराश्य येत असते. मुलांना काय आवडते. ते कोणत्या क्षेत्रात विशेष रुची ठेवतात यावर आधिपासूनच पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

ज्या विषयात त्यांना आनंद मिलतो तेच करीअर म्हणून निवड्यास मुले जास्त उत्साहाने व मनलावून त्यात सहभाग घ;तील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

मुलांच्या संगोपनात बालपणापासूनच त्यांना दिशा देण्याचे काम होणे गरजेचे आहे. मुलानी सर्वांगिण क्षेत्रात सक्षम करण्यासाठी त्यांचे विविध व्यसंग वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अभ्यासासोबतच मैदानी खेळांतही त्यांनी रुची वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

परिक्षांमधिल यशापयशाने खचून न जाता आपल्या उद्दीष्टासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी पालकांसोबतच शिक्षक व मित्रांची भूमिका अतिशय महत्वाची राहणार असल्याचा मतप्रवाह पूढे आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!