Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

Video : विधानसभेचा रणसंग्राम : पायाभूत सुविधांचा अभ्यास करूनच सर्वसामान्य करणार मतदान

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहराच्या क्षमता मोठ्या आहेत. त्यामानाने शहराकडे पाहण्याचा दृष्टीकोन उपेक्षित दिसून येतो. कला क्रिडा, साहीत्य व सांस्कृतीक क्षेत्राचा स्वत:चा वेगळा वारसा आहे. त्यात भर घालत रोज नवनवे विक्रमांशी स्पर्धा करणारे तरुण तयार होत आहेत. मात्र त्यांना त्या दर्जाच्या सूविधा मिळत नसल्याने एका अर्थाने नाशिकची पिछेहाटच होताना दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांच्या प्रश्नाशी नाळ जोडणारा, त्यांच्या समस्यांची जाण असणारा व त्या विना तक्रार पूढाकार घेऊन सोडवणारा नेता नाशिकला हवा आहे. अशा उमेदवाराला मतदान करणे गरजेचे असल्याचा सूर जागरुक मतदारांच्या चर्चेतून उमटला.

दै. देशदूततर्फे आयोजित करण्यात आलेल्या देशदूत रणसंग्राम या चर्चासत्रात छत्रपती पूरस्कार विजेते आनंद खरे, प्रसिध्द बासरीवादक मोहन उपासनी, वीजय मोयर ड्रायव्हींगचे संचालक राजेश देशपांडे, सराफ असोसिएशनचे पदाधिकारी सुनिल महालकर, ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले हे होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी लोक प्रतिनिधींच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या सुविधांचा दर्जा व गुणवत्ता मुळात तपासणे गरजेचे आहे.

एकच काम सातत्याने करावे लागू नये त्या कामामुळे नागरीकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता त्या लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरीकांनी सातत्याने पाठपूरावा करुनही प्रश्न सूटणार नसतील अथवा मतदानापूरते मतदारांच्या दारात जाणारे अथवा नंतर 5 वर्ष न फिरकणार्‍या उमेदवारांना मतदारांनी आवरणे  गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

देशदूत रणसंग्राम विधानसभेचा सर्वसामान्य नागरिक, अपेक्षा आणि आगामी निवडणुका #FBLIVE #Deshdoot #Nashik #Nasikदैनिक देशदूत Deshdoot Times

Posted by Deshdoot on Thursday, 17 October 2019

शहराला स्वा. सावरकर, दादासाहेब फाळके, कवी कुसूमाग्रज, पं.पलूस्करांसारख्या दिग्गजांचा वारसा असताना सांस्कृतीक क्षेत्रात नाशिकची पिछेहाट होताना दिसून येत आहे. शासनाच्या मालकीच्या वास्तूंना केवळ व्यवसायिक कार्यक्रमांसाठीच ठेवर्‍यात आल्याचे चित्र असल्याने कलाकारांची घूसमट होत असून, याबाबत लक्ष देण्यासाठी कोणीच पूढाकार घेत नसल्याची खंत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

क्रिडाक्षेत्रातील सर्वोच्च स्पर्धा असलेल्या ऑलिम्पीकपर्यंत मजल मारणार्‍या खेळाडूंमध्ये नाशिकचे खेळाडू आहेत. मात्र त्यांना सरावासाठी त्या दर्जाच्या सूविदा शहरात उपलब्ध होत नाहीत अन्यथा आणखी खेळाडू तयार होऊ शकतील मात्र याकडे लक्ष देण्यात प्रशासनाला ‘इंटरेस्ट’ नसल्याची कोटी त्यांनी केली. लोकप्रतिनिधींचा रेटा यासाठीं असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराला स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न करताना नागरीकांची कमीतकमी गैरसोय होईल याचा विचार करणेही गरजेचे आहे. शहर स्मार्ट होताना बाजारपेठ उध्वस्थ होणार नाहीत याची काळजी घेण्याची भूमिका प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींची असरे गरजेचे आहे.

या गुणवत्तांच्या कसोटीवर पारखून मतदान जागरुकपणे केल्यास आगामा काळात नागरीकांच्या प्रश्न हे उमेदवारांच्या अगस्तानी राहतील व नागरीकांशी नाळ जोडण्याची धडपड राहील असा विश्वास चर्चासत्रातून उमटला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!