Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

देशदूत संवाद कट्टा : पक्ष कुठलाही असो, ‘नाशिक’च्या विकासासाठी आमदारांनी एकत्र यावे; बिल्डर्सच्या चर्चासत्रात सूर

Share

नाशिक | प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून जनतेने निवडणून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा आहेत. नाशिकच्या विकासासाठी काय केले पाहिजे?. याबाबत देशदूत आयोजित रणसंग्राम विधानसभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील बिल्डर्स उपस्थित होते. यात जितुभाई ठक्कर, सुनील कोतवाल, सुनील भायबंग, सुनील गवांदे यांचा सहभाग होता.

#DeshdootFBLive राजकिय संवाद कट्टा :

Posted by Deshdoot on Sunday, 13 October 2019

नाशिकमध्ये विकासाला खूप वाव आहे, परंतु सरकारच्या करप्रणालीमुळे याठिकाणी कुठेतरी बाधा येताना दिसते. हे कर कमी केले तर अनाक नाशिक डेव्हलोप होईल.

नाशिकमध्ये कराचे प्रमाण जर वैयक्तिक राहण्यासाठी जर वार्षिक दोन हजार रुपये असेल तर तेच घर भाडेतत्वावर दिले तर ती कमर्शियल मालमत्ता होते. तेव्हा घरपट्टी दुप्पट भरावी लागते. रेरा कायद्यामध्ये अनेक गोष्टी पूर्ण करण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे अनेक मालमत्ता वेळीचं पूर्ण होत नाहीत, परिणामी बिल्डर्सला तोटा सहन करावा लागतो.

ज्याची जागा आहे, ज्याला त्या जागेचा विकास करायचा आहे याबाबत अनेक अडचणी येतात. येथे बिल्डर्सला मोठा तोटा सहन करावा लागतो. याबाबतचे जे धोरण आहे, ते बदलले गेले पाहिजे.

नाशिकमध्ये चार आमदार आहेत, आमदारांनी एकत्रित येऊन विधानसभेत आवाज उठवला पाहिजे. येथे एकाच पक्षांचे आमदार असून एकमेकांमध्ये नाशिकच्या बाबतीत विकास करण्याचा जो दृष्टीकोन आहे तो बदललेला दिसतो.

कोपरगावमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे आमदार गावाच्या विकासासाठी एकत्र येऊ शकतात तर नाशिकमध्ये असे का होत नाही याची खंत वाटते. बिल्डर्सकडून अपेक्षा हीच राहील की, लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन उद्योग आणावेत, शहर विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे.

नाशिकमध्ये निसर्ग पर्यटनासाठी मोठा वाव आहे. नाशिकमध्ये लाखो भाविक, पर्यटक पर्यटनासाठी येतात. मात्र, त्यांना नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर आल्यानंतर हिरमोड होतो. अनेक ठिकाणी पार्किंगचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न आहेत. पायाभूत सुविधांवर आमदारांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.

आमदारांनी आपापसातील मतभेत टाळून शहर विकासासाठी एकत्र आले पाहिजे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचा dr बारा वर्षांनी मोठा निधी येतो, याचा उपयोग शहर विकास, पायाभूत सुविधांसाठी करून घेतला पाहिजे.

महापालिकेच्या शाळा दिल्लीच्या धर्तीवर डिजिटल झाल्या पाहिजेत. शिक्षणाचा दर्जा सुधारला तर साक्षरता वाढेल परिणामी विकास वाढीस लागेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!