Video : देशदूत राजकीय कट्टा : नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्याशी गप्पा

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक मध्य परिसरात अनेक महत्वाची कामे गेल्या पाच वर्षान केली आहेत. यावेळीही पुन्हा एकदा मध्य नाशिकच्या जनतेने मला कौल दिल्यानंतर जबाबदारी वाढली असून सर्वच क्षेत्रात चांगली कामे करण्यासाठी मी बांधील आहे. पायाभूत सुविधांवर सध्या लक्ष आहे. या परिसरात महाविद्यालय आहेत. त्यात शैक्षणिक दर्जा वाढीस लागावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

नाशिक मध्य मध्ये जुने नाशिकचा परिसर आहे. याठिकाणी अधिक विकासकामांवर भर दिला जाणार आहे. मतदार संघातील पायाभूत सुविधा आरोग्याच्या सुविधांवर मुख्यत्वे माझे लक्ष राहणार आहे.

नाशिकमध्ये कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. त्यामुळे नाशिकमध्ये धार्मिक वारसा सोबतच आता वेगवेगळ्या क्षेत्रात नाशिक नाविन्यपूर्ण कामगिरी करताना नजरेस पडत आहे.

नाशिकमध्ये औद्योगिक वसाहत मोठी आहे. येथील कामगार संघटनांच्या धोरणामुळे उद्योग आले नाहीयेत. दिंडोरीच्या अक्रालेमध्ये अधिक दर असल्याने याठिकाणी उद्योग आले नाहीत. यावर काम करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासाठी  १ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत.

गंगा आरतीच्या धरतीवर गोदा आरती सुरु केली. हा भाग मध्य नाशिकमध्ये येत असल्यामुळे माझ्या प्रयत्नांना याठिकाणी यश आले आहे.

या लिंकवर क्लिक करून आपण ही चर्चा पाहू शकता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *