Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : सामाजिक भान जपणार, मदतीचा हात देणार; देशदूत आयोजित किड्स कट्टयात...

Video : सामाजिक भान जपणार, मदतीचा हात देणार; देशदूत आयोजित किड्स कट्टयात विद्यार्थ्यांचा सूर

नाशिक | प्रतिनिधी 

देशदूत गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक भान (सिव्हिक सेन्स) या विषयावर जनजागृती करत आहेत. जनजागृतीची सुरुवात लहानग्यांपासून झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देशदूतकडून शहरातील सेंट लॉरेन्स स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद कट्ट्याचे आयोजन केले होते. यावेळी सामाजिक भान जपणार आणि इतरांनादेखील जपण्यास सांगणार, जिथे कुठे काही चुकीचे होत असल्याचे, डोळ्यांना दिसल्यास त्यास विरोध करून सामाजिक जाणीव लक्षात आणून देणार असल्याचा सूर यावेळी विद्यार्थ्यांसोबतच्या चर्चेत निघाला.

- Advertisement -

यावेळी कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बलाजीवाले यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या चर्चेत वर्तमानपत्रांचे महत्व, चालू घडामोडींवर विद्यार्थ्यांचा दृष्टीकोण किती आणि कसा महत्वाचा आहे याबाबतचे मार्गदर्शन डॉ. बालाजीवाले यांनी विद्यार्थ्यांना केले. इयत्ता नववीतील पाच विद्यार्थ्यांच्या एका समूहाने कट्ट्यात सहभाग घेतला. तर याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनाही या कट्ट्यादरम्यान सामावून घेण्यात आले.

सामाजिक भान जपताना लग्नसोहळ्यात होणारी अन्नाची नासाडी, सामाजिक वर्तन, स्वच्छतेचा अभाव याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनीदेखील वाया जाणाऱ्या अन्नावर बोलताना भूक लागेल तेव्हढेच अन्न ताटात वाढून घ्यावे, तसेच निमंत्रण असतील तेव्हढाच स्वयंपाक गरजेचा असल्याचे सांगितले. तसेच उरलेले अन्न स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्याच वेळी वाटले गेले पाहिजे असेही काहींनी मांडले.

रस्त्याने चालताना वयोवृद्धांना रस्ता ओलांडण्यास मदत केली पाहिजे. ट्राफिक सिग्नल पाळले पाहिजेत, रस्ता ओलांडताना झेब्रा क्रोसिंगने ओलांडला गेला पाहिजे. हेल्मेट परिधान केले पाहिजे अशा अनेक मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी चांगले वाईट अनुभवदेखील कथन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या