Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा

Share

नाशिक | प्रतिनिधी

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव सोहळा आज मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे. हा कार्यक्रम देशदूतच्या फेसबुक पेजवर लाईव्ह आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगवर्धिनी संस्थेच्या ज्येष्ठ समाजसेविका चंद्रिका चव्हाण आणि मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती आहे.

प्रमुख पाहुण्यांचा सन्मान सोहळा पार पडल्यानंतर चंद्रिका चव्हाण यांची ओळख ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे यांनी करून दिली. यानंतर चव्हाण यांच्या व्याख्यानास सुरुवात झाली.

यावेळी चव्हाण यांनी त्यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले. महिलांनी महिलांसाठी उभी केलेली चळवळ म्हणजे उद्योगवर्धिनी संस्था स्थापन झाल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक पद भूषवलेल्या चव्हाण यांनी आदर्श नगरसेविका पुरस्काराचा मानही मिळवला.

पुरस्कार मिळाल्याने जबादारी वाढते यामुळे अधिक उर्जेने काम करायचे होते. त्यानंतर महिला जोडल्या, अनेक महिला खंबीरपणे उभ्या राहल्या. त्यातून अनेक कामे व्हायला सुरुवात झाली.

महिला आमच्याकडे जेव्हा आल्या तेव्हा त्या कुठल्यातरी समस्या घेऊन आल्या. यात महिला खूप शिकलेल्या नव्हत्या. त्यातून महिला काय करू शकतात याची माहिती घेतली. त्यानंतर महिला काय करू शकते हे तपासले. तिथून महिलांना मार्गदर्शन केले. महिला आल्या की त्यांना जेवण दिले जाते, त्यासोबतच जाताना तिच्याकडून भाकरी बनवून घेतल्या जातात.

महिलांना एकत्र आणून एकत्रितपणे काम करून घेतले जाते. अगदी स्वयंपाक घरात काम करणारी महिलादेखील आम्ही सदस्य असून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. महिलांना सर्वगुणसंपन्न बनविले जाते. बचत गट उभे करून आम्ही महिलांना उद्योजिका बनविण्यास सांगतात.

उद्योगवर्धिनी संस्था माणसांच्या आधारावर सुरू आहे. कुठलेही पैसे नसताना आम्ही महिलांना शिकवले. आज अगदी काही शे रुपयांनी सुरु झालेला व्यवसाय आज करोडो रुपयांची उलाढाल करून देत आहे. उद्योगवर्धिनीच्या महिलांची मजल आज मॉल उभारणीकडे गेली आहे. याबाबत अनेक उदाहरण देऊन चंद्रिका चव्हाण यांनी देशदूत कर्मयोगीनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी चव्हाण यांनी अनेक प्रेरणादायी प्रवास उलगडले.

देशदूत कर्मयोगिनी पुरस्काराच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या गौतमी देशपांडे यांनीदेखील यावेळी मान्यवरांशी संवाद साधला. गौतमी म्हणाली, विविध क्षेत्रात महिला आज उत्तम कामगिरी बजावत आहेत. महिला सक्षमीकरणाची आज खूप गरज आहे. महिला सक्षमीकरणाची सुरुवात घरातून झाली पाहिजे. स्वत: मॅकॅनिकलची विद्यार्थिनी असूनही मी ते शिक्षण पूर्ण केले. यात अनेकजन वेगवेगळी मत मतांतरे मांडत होती. टीकाकारांची प्रेरणा घेऊन मी आजवर इथवर पोहोचली आहे. जेव्हा महिला सक्षमीकरणासाठी कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत तेव्हाच महिला सक्षमीकरण झाले असे समजता येईल.

सर्व परीक्षकांचा सन्मान पार पडला.

कर्मयोगिनी पुरस्कार सोहळा

वैद्यकीय क्षेत्र

परीक्षक निवड : डॉ. राजश्री पाटील

 • ईएसआयएसमधून १९९१ पासून मेडिकल ऑफिसर म्हणून करिअरला प्रारंभ.
 • आयएमएमध्ये सक्रिय सहभाग. मिशन पिंकचा उपक्रम यशस्वीपणे राबवला.
 • नॅशनल वुमन डॉक्टरर्स विंग महाराष्ट्र स्टेट सहसचिवपदी असताना तेजस्विनी प्रोजेक्ट राबवला.
 • मुलींमधील ऍनेमिया रोखण्यासाठी ‘मिशन पिंक’ची मुहूर्तमेढ

ऑनलाईन पसंती : डॉ. प्रतिभा औंधकर

 • अँटी रेटर व्हायरल थेरपी ट्रीटमेंट नाशिकमध्ये सूरू
 • गेल्या ४ वर्षांपासून ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम
 • रेड क्रॉसची एक्सझिक्युटीव्ह मेंबरपदी निवड
 • फॅमिली फिजिशियन असोसिएशनची पहिली महिला अध्यक्ष
 • कष्टकरी स्त्री वर्गातील बी. पी., कँसर, डायबिटीज् वर विशेष उपाय योजना

कृषी क्षेत्र

परीक्षक निवड : ज्योत्स्ना दौंड

ऑनलाईन पसंती : शीला दिघे

शिक्षण क्षेत्र 

परीक्षक निवड : पुष्पा चोपडे

ऑनलाईन पसंती : जे. डी. सोनखासकर

डॉ. जोत्सना सोनखासकर
 • मविप्रच्या पहिल्या महिला प्राचार्य
 • शहरातील सिडको कॉलेजची प्राचार्य म्हणून कार्यरत
 • अनेक वर्षांपासून राज्यशास्त्र शिकवतात
 • आदर्श शिक्षक पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित
 • अनेक सामाजिक कामांसाठी पुढाकार

उद्योग क्षेत्र 

परीक्षक निवड : जोत्स्ना सुरवाडे

 • निफा वाईन उद्योगाची उभारणी
 • पती अशोक यांची मदत
 • दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल
 • वाईन मेकिंगसोबतच वाईन टूरिझमचेही काम

ऑनलाईन पसंती : मीनाक्षी दळवी

 • सन टू आय फॅ क्टरी, एस. बी. पॅकेजिंग असे दोन युनिटची उभारणी
 • शून्यापासून व्यवसायाला सुरुवात
 • अनेक महिलांना व्यवसाय, तसेच स्वतःच्या पायावर उभे केले

कला आणि संस्कृती नामांकन 

परीक्षक निवड : मीना परुळेकर

ऑनलाईन पसंती : शिल्पा देशमुख

सामाजिक क्षेत्र 

परीक्षक निवड : माया खोडवे

ऑनलाईन पसंती : प्रणिता तपकिरे

क्रीडा क्षेत्र

परीक्षक निवड : अश्विनी देवरे-शेवाळे

ऑनलाईन पसंती : शैलजा जैन

विधी क्षेत्र 

परीक्षक निवड : क्षमा संघमोली

ऑनलाईन पसंती : शीतल पाटील

राजकीय क्षेत्र 

परीक्षक निवड : हिमगौरी आडके-आहेर

ऑनलाईन पसंती : सीमंतिनी कोकाटे

आर्किटेक्ट क्षेत्र

परीक्षक निवड : अंजली पारेख

ऑनलाईन पसंती : रोहिणी मराठे

वाचक क्षेत्र शहर

परीक्षक निवड : संगीता फुके

ऑनलाईन पसंती : सायली पालखेडकर

वाचक श्रेणी ग्रामीण

परीक्षक निवड : संगीता पाणगव्हाणे – मुठाळ

ऑनलाईन पसंती : मनीषा जगताप

यंगेस्ट कर्मयोगिनी पुरस्कार : ईश्वरी दसककर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!