देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०१९ : बाल रुग्णसेवेतून सार्थ आनंद – डॉ. शीतल पगार

0
  • नवजात शिशू तसेच बालरोगतज्ञ म्हणूनरुग्णसेवेत कार्यरत.
  • ऑस्टे्रलियात बालरोगतज्ञ म्हणून समृद्ध अनुभव.
  • विविध क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या उपचारातून नवजात शिशूंना जीवनदान
  • आदिवासी पाडे, वाड्या-वस्त्यांवरील कुपोषित बालकांवर उपचार शिबिराद्वारे *जीवघेण्या आजारातून मुक्तता
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूर येथे ‘मिसेेस इंडिया इंटरनॅशनल’ स्पर्धेत *यशस्वी सहभाग. आयएमए, बालरोग तज्ञांच्या संघटनेत सक्रिय सहभाग, ट्रॅकिंगची आवड.

मी मूळची नागपूरची. १२ वीपर्यंतचे शिक्षण तिथेचे झाले. सर्व नातेवाईक नाशिकमध्ये असल्याने नाशिकमध्ये नित्य येणे-जाणे असे. डॉ. वसंत पवार मराठा विद्या प्रसारक मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस पूर्ण केेले.

ग्रॅज्युएशननंतर लगेच विवाह झाला. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. एक बालरोगतज्ञ आणि नवजात शिशूतज्ञ म्हणून काम करते. माझे पती याच क्षेत्रात असून ते बालरोगतज्ञ आहेत.

पोस्ट ग्रॅज्युएशननंतर सहा महिन्यांतच माझ्या पतींना ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे आम्ही दोघेही ऑस्ट्रेलियात ८ वर्षे वास्तव्यास होतो.

तेथील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा दिली. विविध विभागांमध्ये काम करताना अनुभवविश्‍व समृद्ध होत गेले. माटर मदर्स हॉस्पिटल, रॉयल चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, सिडनीमधील चिल्ड्रेन्स हॉस्पिटल आदी रुग्णालयांमध्ये सेवा देऊन वेचता येतील तेवढे अनुभवकण वेचले.

सध्या नाशकात अ‍‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग डॉक्टर आहे. त्याचप्रमाणे पाईपलाईन रोडवर गुलमोहर कॉलनीत क्लिनिक आहे.

खरेतर प्रत्येक घरामध्ये घरातल्या सुनेकडून बर्‍याच अपेक्षा असतात. तशाच अपेक्षा माझ्याकडूनही होत्या. पण मला पुढे शिकून या क्षेत्रात काम करायच आहे, हे माझे ठाम मत असल्याने माझा या क्षेत्रातील पुढचा प्रवास करू शकले.

अनेकदा ४८ तास सलग काम करावे लागायचे. पण घरच्यांचाही मला पाठिंबा मिळाला. मला या क्षेत्रात आणणारे माझे वडील होय. मी डॉक्टर व्हावे असे माझ्या बाबांचे स्वप्न होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर व्हायचे ठरवले.

आपल्याकडे लोकांना स्वत: शरीराबद्दल पूर्ण माहिती, ज्ञान नसते. आरोग्य या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते आणि या विषयाला कुणी गांंभीर्याने घेत नाही, असे चित्र आहे. अनेकदा रुग्ण रोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो किंवा दुखणे अंगावर काढतो आणि डॉक्टरांकडे उशिरा पोहोचतो.

यामुळे हवे ते उपचार त्याला वेळेवर मिळत नाही, ही मोठी खंत आहे. बाळ जन्माला येते त्यावेळी काहींच्या गळ्याभोवती नाळ असते. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असतो किंवा बाळ पोटात शौच करतात आणि ती त्यांच्या छातीमध्ये जाते.

पण आता तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. त्याची साथ घेऊन या सर्वांवर योग्य उपचार होऊ शकतात. उपचारानंतर लगेचच नवजात शिशू त्यास प्रतिसाद देऊ लागतात. अनेकदा अकाली बाळ जन्माला येते. तेव्हाही विविध समस्या उद्भवतात.

पण उपचारांनंतर पालकांंच्या चेहर्‍यावरील आनंद, हास्य जग जिंकल्याचा आनंद देतो. वैद्यकीय क्षेत्रासह मला मॉडेलिंगमध्ये विशेष रस आहे. मी ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०१८’साठी सिंगापूरला गेले होते. हा खूप छान अनुभव होता.

याशिवाय ट्रेकिंग करायलाही मला आवडते. आमचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा ग्रुप असून त्या माध्यमातून या आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमात, कार्यात नेहमीच सहभाग देते. नियमीतपणे विविध ठिकाणी ट्रेकिंगला जातो. नुकतेेच आम्ही रामशेज, हरिहरगड, रतनगड ट्रेक पार केला.

मी इंडियन अ‍‍ॅकेडमी ऑफ पेडिऍट्रिकची सक्रिय सदस्य आहे. नाशिक लगतच्या भागांमध्ये कुपोषित बालके, त्यांच्या पालकांसाठी शिबिरे नियमित घेतो. काही बालके अत्यंत गंभीर अवस्थेत होती. त्यांच्यावर आम्ही त्यावेळी उपचार केले नसते तर ती दगावली असती. मात्र त्यांना जीवनदान देताना बालरोगतज्ञ असल्याचा आनंद होतो.

त्याचप्रमाणे सेव्ह गर्ल चाईल्डवर आम्ही काम करत आहोत. मी सर्व महिलांना हेच सांगेन की, ‘लिंग ओळख चाचणी’ करू नका. तुम्ही तुमच्या बाळासाठी ठामपणे उभे राहू. प्रत्येकाने स्वतःवर प्रेम करावे. आरोग्यासाठी वेळ काढलाच पाहिजे.

सकाळी उठल्यापासून सर्व महिला इतरांसाठी काम करत असतात. पण प्रत्येकीने थोडातरी वेळ स्वतःसाठी काढून स्वतःकडे लक्ष द्यायला हवे. हे फक्त शारीरिक आरोग्यासाठी नाही तर मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे.

 

LEAVE A REPLY

*