Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : देशदूत इम्पॅक्ट : प्रशासनाला जाग; गोंदे फाट्यावर गतिरोधक बसवले

Share

बेळगाव कुऱ्हे | वार्ताहर

गोंदे महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; वर्षभरात 41 अपघाती मृत्यू या शीर्षकाखाली ‘देशदूत डिजिटल’ने गेल्या दोन दिवसांपूर्वी व्हिडीओसह बातमी प्रसिद्ध केली होती. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून आज याठिकाणी गतिरोधक बसिविण्यात आले आहेत. ‘देशदूत’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेतल्यामुळे ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.

गतीरोधक नसल्यामुळे मुंढेगाव ते राजूरफाटा दरम्यान वर्षभराच्या कालावधीत आतापर्यंत एकूण 242 अपघात घडले. यात 418 व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना वर्षभरात घडल्या आहेत. सन 2019 मध्ये 16 अपघातात 14 व्यक्ती मयत झाल्या. एकूण 41 व्यक्तींना प्राण गमवावा लागला याबाबत सविस्तर बातमी देशदूतने प्रसिद्ध केली होती.

सततच्या अपघातांच्या मालिकांमुळे ग्रामस्थ जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत होते. तर दुचाकीस्वारांना याठिकाणी रस्ता बदलताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा.

गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी केली जात होती. अनेकदा मागणी करूनदेखील प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. त्यानतंर ‘देशदूत’ने याबाबत आवाज उठवत नागरिकांची मागणी मांडली होती.

दरम्यान, यावृत्ताची दखल घेत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करत गतिरोधक बसविण्यात आले आहेत. यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी होत असून नागरिकांची सततची होणारी गैरसोय आता होणार नसल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!