Thursday, April 25, 2024
Homeनाशिकलासलगाव येथे आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव, सुवर्ण महोत्सवानिमित्त उपक्रम : व्होकार्ट, नामको...

लासलगाव येथे आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव, सुवर्ण महोत्सवानिमित्त उपक्रम : व्होकार्ट, नामको हॉस्पिटलचे सहकार्य

लासलगाव । प्रतिनिधी

नाशिकच्या मातीतून अंकुरलेले एकमेव वृत्तपत्र दैनिक ‘देशदूत’ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्य महोत्सव अभियान सुरु झाले आहे. आज दि.21 रोजी लासलगाव येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत श्री महावीर जैन विद्यालयात आरोग्य महोत्सव होणार आहे.

- Advertisement -

सामाजिक बांधिलकी जपणार्‍या ‘देशदूत’ने सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महिला आरोग्याची निकड लक्षात घेता ‘देशदूत’ने आरोग्य महोत्सवाचा उपक्रम हाती घेतला आहे.

जिल्ह्यातील 20 ठिकाणी महिलांसाठी आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील नामांकित व्होकार्ट आणि नामको हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स विद्यार्थिनी व महिलांची विनामूल्य आरोग्य तपासणी करुन मौलिक मार्गदर्शन करतील. उंची, वजन, रक्तदाब, रक्तातील साखर, इसीजी, बीएमआय, गर्भाशय मुखाचा कॅन्सर या तपासण्या महोत्सवात केल्या जाणार आहेत.

सुवर्ण महोत्सवानिमित्त मार्च 2020 अखेरपर्यंत ‘देशदूत’ जिल्ह्यातील 20 ठिकाणी हा आरोग्य महोत्सव घेत आहे. लासलगाव येथील आरोग्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी सरपंच संगिताताई शेजवळ, बाजार समितीच्या सभापती सौ.सुवर्णाताई जगताप, माजी जि.प. सदस्या श्रीमती कुसूमताई होळकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री.सुनिल अब्बड, मुख्याध्यापक श्री.दिलीप डुंगरवाल, देशदूतचे महाव्यवस्थापक श्री.आर.के.सोनवणे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील गरजुंनी आरोग्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बचत गटांची जत्रा

आरोग्य महोत्सवाच्या ठिकाणी बचत गटांची जत्राही आयोजित केली आहे. तालुक्यातील बचत गटांना यानिमित्त व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. बचत गटांच्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीही केली जाणार आहे.

सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन

सामाजिक भान जपत देशदूततर्फे श्री महावीर जैन विद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन
वेंडिंग मशिन भेट देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या