वाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले

0
नाशिक शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी सर्वांनी दूरदृष्टी ठेवून एसटी बस, मेट्रो व रेल्वे सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे. त्यासाठी आत्तापासून अंमलबजावणी केली पाहिजे. पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आहे तेच रस्ते सुनियोजित करत त्यांचेच सुशोभीकरण केल्यास रहदारी व वाहतूक कोंडी होणार नाही. रस्ते विकासापेक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी. कारण नागरिकांना वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध झाल्यास त्यांचे जीवनमान अधिक सुसाह्य होईल.

माझ्या बालपणी नाशिक शहरात रस्त्यांवर खासगी वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे रविवार कारंजा, अशोकस्तंभ येथून मखमलाबाद, सातपूर, मुंबईनाका, द्वारका येथे वीस मिनिटांमध्ये जाता येते होते. मात्र, आता शहरात रस्ते जास्त झाले असून खासगी वाहनांची संख्याही वाढली आहे.

पूर्वी रस्ते तयार करताना दूरदृष्टी न ठेवल्याने आता रस्त्यांवर विक्रमी वाहने आली आहेत. त्यामुळे कॉलेज रोड, गंगापूर रोड, मेन रोड, पुणे रोड व त्र्यंबक रोड वाहनांची गर्दी वाढली आहे. पायी जाणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरुन रस्त्या ओलंडावा लागत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. अमृतधाम येथून सी. बी. एस. व त्र्यंबक रोडला येण्यासाठी आत्ता अर्धा ते पाऊण तास लागत असून भविष्यात दूरदृष्टी ठेवून आत्ताच नियोजन केले नाही तर याठिकाणी जाण्यासाठी एक तास लागेल. सरकार व नाशिककरांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित केली पाहिजे.

रस्त्यांवरील एक लेन सार्वजनिक वाहनांसाठी व दुसरी लेन इतर वाहनांसाठी ठेवल्यास सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढेल व पर्यायाने महसूल वाढेल. वाहतुकीचे नियम पाळत लेननुसार शिस्तबद्ध वाहनांची वाहतूक झाल्यास अपघातही कमी होतील व पर्यायाने वाहतुकीचे नियम सर्वजण पाळतील. सार्वजनिक वाहनांसाठी स्वतंत्र्य लेन ठेवल्याने ही वाहने अपेक्षित ठिकाणी वेळेत जातील.

त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीची नागरिकांना सवयही लागेल. नाशिक शहर जागतिक दर्जाचे होण्यासाठी मुख्य शहर आणि उपशहर अशी संकल्पना राबवली जावी. त्र्यंबकेश्वर ते सातपूर व अशोकस्तंभपर्यंत पर्यायी सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्यास कमी खर्चात व ठराविक वेळेत नागरिकांना ये-जा करता येईल. त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.

स्थानिक वाहतूकमध्ये शहर बस वाहतूक, लोकल रेल्वेमार्ग, मेट्रो आदी पर्याय उपलब्ध असल्यास खासगी वाहनांची संख्या मर्यादित राहिल व वाहतुकीचा ताण कमी होईल. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, निफाड, चांदवड, दिंडोरी येथून नाशिक शहरात नोकरीनिमित्त तसेच दैनंदिन कामानिमित्त येणार्‍या नोकरदार वर्ग व नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशांसाठी आत्तापासून पर्यायी सार्वजनिक वाहतूक सक्षम उपलब्ध केल्यास भविष्यातील वाहतूक कोंडीचा ताण कमी होईल.

नाशिक ही कुंभनगरी, तसेच धार्मिक पर्यटन नगरी म्हणूनही ओळखली जाते. यासह येथे कृषी, वाईन, निसर्ग, साहशी या आणि अशा विविध नव्या पर्यटनाला अधिक वाव आहे. याशिवाय मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा महानगरांपासूनची समीपता यामुळे या शहराला अधिकच महत्त्व प्राप्त झाले. आहे.

आल्हाददायी हवामान यासह शहराच्या जवळून जाणारा समृद्धी महामार्ग यामुळे नजीकच्या भविष्यात या शहराचा विकास झपाट्याने होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील सार्वजनिक वाहतुकीचे नियोजनाचे महत्त्व अधिकच गडद होते. राज्याची कृषी राजधानी म्हणूनही हे शहर अधिकच वेगाने वाढत आहे.

LEAVE A REPLY

*