Type to search

दिशादर्शक फलक लावावेत – सनी वाणी

Special माझं नाशिक

दिशादर्शक फलक लावावेत – सनी वाणी

Share
नाशिक शहराचा विस्तार चोहोबाजूने हळूहळू होऊ लागला आहे. शहराच्या बाहेरील भागात मोठे रस्ते आहेत. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे रस्ते आता छोटे पडू लागले आहेत. गंगापूर रोड, कॉलेज रोड म्हणजे शहराच क्रीम भाग.

या भागात जे रस्ते झाले आहेत, ते रस्ते आता अरुंद पडत असून ते रूंद असणे आवश्यक झाले आहे. कारण जे सध्याचे रस्ते आहेत. त्यावर अतिक्रमण होऊ लागल्याने आहे, ते रस्ते आता छोटे पडू लागले आहेत.

गंगापूर रोड, कॉलेज रोड भागात वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण या भागात वाढत असल्याने या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे प्रमाण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत.

कॉलेज रोड तसेच गंगापूर रोडवरील विविध सर्कलवर तर सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी तर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. वाहतुकीचे नियम या भागात पाळले जात नाहीत. त्यामुळे आता या रस्त्यावर अजून सिग्नलची संख्या वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.

या रस्त्यांवर तसेच शहराच्या विविध भागात पावसाळा असो वा इतर काळात पाणी साचण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालताना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात सर्कस करत चालावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर भूमीगत पाईपलाईन टाकण्याचे काम होणे गरजेचे आहे. महानगरपालिकाकडून हे काम तातडीने होणे आवश्यक आहे.शहराच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नाही.

त्यामुळे विविध भागातून नाशिकमध्ये येणार्‍या वाहनधारकांना हे दिशादर्शक फलक नसल्याने रस्ते कुठे जातात, हे लक्षात येत नाही. तसेच निश्चित पत्त्यावर पोहोचता येत नाही. त्यामुळे या वाहनधारकांची मोठी अडचण होऊन जाते. याबरोबरच मग अशा वाहनधारकांकडून रस्त्यांवर, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावली जातात.

जेथे नो पार्किंगची जागा आहे, त्या ठिकाणी देखील दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना लक्षातही येत नाही. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने व वाहतूक पोलिसांनी शहराच्या अशा विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. हे झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास व पार्किंगच्या ठिकाणी वाहने लागल्यास निश्चितच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर शहरामध्ये काही ठिकाणी स्वच्छता आहे. मात्र, काही ठिकाणी अस्वच्छतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

याचे उदाहरणच द्यायचे म्हटले तर वकीलवाडी परिसरात फेरफटका मारला तर कचराकुंडी अजूनही शहरात सुरूच आहे की काय? असे तेथील कचरा पाहून वाटते. येथील कचरा उचलला जात नाही, तसेच गंगापूर रोडवर देखील चौकाचौकात पडलेल्या अशा कचर्‍याचा सामना या ठिकाणच्या रहिवाशांना करावा लागत आहे.

ठक्करनगर, शरणपूर रोड या भागात अशीच परिस्थिती असून याठिकाणचे पथदीप गेल्या काही वर्षांपासून अद्यापही बदललेले नाही. याकडे नाशिक महानगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे. शहरामध्ये झाडांचे प्रमाण समाधानकारक असले तरी हे प्रमाण अजून वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरून नाशिक शहरातील वातावरण स्वच्छ राहील व प्रदूषण वाढणार नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!