रस्त्यांचा स्मार्ट विकास – निलेश बाफना

0

नाशिक शहरास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे शहराचा ऐतिहासिक ठेवा जतन झाला पाहिजे. शहरात दिवसेंदिवस काँक्रिटीकरण वाढत असल्यामुळे ऐतिहासिक शान कमी होत आहे. नाशिक शहराने आत्ता स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू केली असून ही चांगली बाब आहे.

त्यासाठी अशोकस्तंभ ते सीबीएस रस्ता विकसित केला जात असल्याने नाशिकसाठी ही चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीनेच शहरातील सर्व रस्ते विकसित झाले तर देशात स्मार्ट शहरांमध्ये ‘नाशिक’ अव्वलस्थानी येऊ शकते.

शहरात ऐतिहासिक तांब्याची व चांदीची भांडी बनवण्याची कारखाने आहेत. ते कारखाने विकसित केले पाहिजेत. त्यासाठी मनपा व राज्य सरकारने कारखान्यांना सोयी व सुविधा दिल्या पाहिजेत. त्यामुळे नाशिकच्या विकासात पडू शकते. कारण नाशिकची चांदीची भांडी देशभर आजही प्रसिद्ध आहेत. तो वारसा नाशिकला लाभला आहे. मात्र, सध्या तो वारसा लोप होत चालला आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे व पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल हे नाशिक शहरात चांगली विकासकामे करीत आहेत. त्यांना नाशिककरांच्या प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढीसाठी मदत होत आहे. नाशिक शहरात विमानसेवा सुरू झाल्यामुळे दिल्ली व मुंबईला जलदगतीने नाशिककरांना जाता येणार आहे. त्यामुळे नाशिकचा विकास झपाट्याने होणार आहे. नाशिकमध्ये एअरपोर्ट, विमाससेवा सुरू झाल्याने औद्योगिक कंपन्यासह आयटी कंपन्यांसाठी सोपा मार्ग झाला आहे.

शहरासह जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्यासाठी व निसर्ग पर्यटन वाढीसाठी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केले पाहिजे. त्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेतर्फे मोफत वृक्षांच्या रोपांचे केले जात आहे. अनेक शाळांकडून वृक्षलागवडीसाठी जनजागृती केली जात असून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक झाड लावले जात असून त्यांचे संगोपन केले जात आहे. तसेच प्रशासनातर्फे वृक्षलागवडीसाठी चांगल्या पद्धतीने जनजागृती केली जात आहे.

प्रदूषण इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहरात कमी आहे. शहारातील नैसर्गिक वातावरण पोषक असून ते वातावरण प्रदूषणविरहित राहण्यासाठी आत्ताच प्रयत्न केले पाहिजेत. प्लास्टिक बंदीचा निर्णय चांगला असून त्याची अंमलबजावणी सर्वांनी केली पाहिजे. प्लास्टिक वापरायचे नाहीच, असे प्रत्येक नाशिककरांनी ठरवले पाहिजे. तर नाशिक प्लास्टिकमुक्त शहर होईल आणि ते नाशिककरांनी करून दाखवले पाहिजे.

गोदाकाठ व रामकुंडावर फिरायला गेलो तर तेथे अनेक लोक गाड्या धुताना व कपडे धुताना दिसतात. त्यामुळे पाणी प्रदूषण होत आहे. गोदाकाठ स्वच्छ राहण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी ठरवले पाहिजे की, माझे शहर स्वच्छ ठेवयाचे आहे. महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. ड्रेनेज वॉटरमुळे प्रदूषण होत असून ते पाणी फिल्टर करूनच सोडले गेले पाहिजे.

त्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त राहण्यासाठी ई-रिक्षा, इलेक्ट्रीक कार सुरू झाल्या पाहिजेत. नाशिक जिल्ह्यात शेती मोठ्या प्रमाणावर केली जात असून शेतीशी संबंधित कंपन्या जिल्ह्यात आल्या पाहिजेत. त्यामुळे शेतमाल परदेशात पाठवणे सोपे होईल. शेतमाल वाहतुकीसाठी कंटेनरयार्ड, विमानसेवा सुरू झाल्यास शेतकर्‍यांना अधिक नफा मिळू शकतो.

LEAVE A REPLY

*