मनाचे आरोग्य सदृढ व्हावे – डॉ. राहुल सावंत

0

पुराणकाळापासून आजपर्यंत आजारी व्यक्ती हवापालटासाठी काही दिवस नाशिक शहरामध्ये येऊन राहिल्यास तन मनाने पूर्णपणे तंदुरुस्त आरोग्य मिळवतात, असा अनेकांचा अनुभव आहे.

सभोवती विपुल नैसर्गिक वनसंपदा, सात्विक अन्न धान्य, बारमाही थंड हवा यामुळे साक्षात धन्वंतरी रूपामधील तज्ञ आयुर्वेद वैद्याची पंढरी ‘नाशिक’ला म्हटले जाते. योग, विपश्यना, व्यायाम, आरोग्यप्राप्ती यासाठी सांगड घालत असताना द्राक्ष ते रुद्राक्ष या दोनही संस्कृतीचा योग्य मिलाप, पाणी, आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यात नाशिककर यांचा मोठा वाटा आहे.

आपल्या संस्कृती उत्सव समारंभाबाबत सजग असणारा नाशिककर आरोग्य प्रति तेवढाच जागरूक असतो. नैसर्गिक साधनसंपत्ती असलेले आरोग्य पोषक वातावरण याशिवाय अनेक मोठ्या शहरांपासून संलग्नता यामुळे ‘हेल्थ हब’ म्हणून नाशिकची ओळख जगभरात होत आहे. आयुर्वेद चिकित्सासोबत अनेक कार्पोरेट हॉस्पिटल, फार्मा कंपन्या यामुळे मेडिकल टूरिझम दिवसागणिक वृद्धिंगत होत आहे.

धार्मिक पर्यटनसोबत तन मनाचे आरोग्यप्राप्ती देणार्‍या या नाशिकमध्ये निश्चितच काही तरी वेगळेपण आहे, हे निश्चितच. मदतीसाठी सदैव तयार असणारा नाशिककरांना या गुणांमुळे भुरळ घातली आहे. धन्वंतरीचे मानवरूप म्हणजे आयुर्वेद तज्ञ वैद्याची पंढरी असे नाशिकला म्हटले जाते. आध्यात्मिक वातावरणात सोबत योग विपश्यना व्यायामासाठी उपलब्ध साधने या सर्वांची सांगड घालण्यात नाशिककर यांचा सिंहाचा वाटा आहे.

आपल्या पौराणिक, ऐतिहासिक रूढी परंपरा उत्साह याबाबत अभिमान बाळगणारा नाशिककर आपल्या तसेच विश्वकल्याण आरोग्याबाबत तेवढाच जागरूक आहे. .रुद्राक्ष ते द्राक्ष या दोन्ही संस्कृतीचा संगम करून आरोग्याचे माहेरघर म्हणून जगभरामध्ये नाशिकची नवी ओळख आहे.

आल्हाददायक वातावरण, तज्ञ वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, मोठ्या शहरापासून संलग्नता, कार्यतत्पर मनुष्यबळाची उपलब्धता असल्याने जगामधील अनेक कार्पोरेट हॉस्पिटल शृंखला डायग्नोस्टिक सेंटर्स फार्मा कंपन्या नाशिकला प्राधान्य देताना दिसतात. या सर्वांचा परिणाम म्हणून मेडिकल टूरिझममुळे नाशिक जगाच्या नकाशावर सर्वात वरचे स्थान घेत आहे.

मंदिरांचे शहर धार्मिक नगरी, यंत्र-तंत्र भूमी असा मुकुट मिरवणारे नाशिक शहर आरोग्यसेवा देण्यामध्ये अग्रेसर वाटचाल करीत आहे. निरोगी व आनंदाची अनुभूती देणार्‍या शहराबाबत नकळत शब्द ओठांतून बाहेर पडतात. ‘कुछ तो जादू है नाशिक के हवा में’, हे मात्र तितकेच खरे.

LEAVE A REPLY

*