Friday, April 26, 2024
HomeजळगावVideo Deshdoot FB Live : कॅन्सर सपोर्ट ग्रुप ‘आम्ही मैत्रीण’ यांचेशी महिला...

Video Deshdoot FB Live : कॅन्सर सपोर्ट ग्रुप ‘आम्ही मैत्रीण’ यांचेशी महिला दिनानिमित्त मुक्तसंवाद

सहभाग : डॉ.उषा शर्मा, ललीता चौधरी, डॉ.श्रध्दा चांडक

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’ अशी एक म्हण पूर्वापार काळापासून आहे. प्रत्येक कुटुंबातील स्त्री स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेते; पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील.

आज आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झालेला आहे. खाण्या-पिण्याच्या सवयी, तणावपूर्ण जीवन, स्पर्धा या सर्व गोष्टींमुळे कर्करोगासारखे रोग जास्त प्रमाणात दिसून येतात. आधुनिक उपचारपद्धतीत अशा आजारांवर नियंत्रण मिळविणे वा पूर्णपणे आजार नाहीसा करणे शक्य झाले असले तरी अशा आजारांचे वेळीच निदान होणे गरजेचे ठरते.

- Advertisement -

याअनुषंगाने या रोगाची माहिती करून घेण्यासाठी व जनजागृतीसाठी जळगाव येथील ‘कॅन्सर सपोर्ट ग्रुप ‘‘आम्ही मैत्रीण’’ ’ यांच्याशी देशदूतच्या माध्यमातून ‘फेसबुक लाईव्ह संवाद कट्टा’ या कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञ डॉक्टवर व ‘आम्ही’ मैत्रीण’ ग्रुपशी साधळेला ‘मुक्त संवाद’ बघत रहा लाईव्ह..

- Advertisment -

ताज्या बातम्या