Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘ज्ञानदूत’ कूपन स्पर्धेचा बक्षीस हस्तांतरण सोहळा; ‘आधी बक्षिसे नंतर स्पर्धा’ स्तुत्य उपक्रम : धात्रक

Share

नाशिकरोड । का.प्र.

‘आधी बक्षिसे नंतर स्पर्धा’ या सूत्रावर आधारित ‘ज्ञानदूत’ कूपन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या बक्षिसांचा हस्तांतरण सोहळा काल जेलरोड येथील स्व. गणेश द. धात्रक संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर विद्यालयात शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानात भर घालण्यासाठी दै. देशदूत व स्व. गणेश द. धात्रक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानदूत’ कूपन स्पर्धेला दि. 10 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या आकर्षक बक्षिसांचा हस्तांतरण सोहळा शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

याप्रसंगी व्यासपीठावर धात्रक शिक्षण संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक, देशदूतचे पराग पुराणिक, विशाल जमधडे, विलास गायकवाड आदींसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी धात्रक यांनी स्पर्धेबाबत माहिती विशद करताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. देशदूतचा उपक्रम स्तुत्य असून स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा वाढीसाठी त्याचा लाभ होणार असल्याचे सांगितले. तसेच या स्पर्धेसाठी धात्रक शिक्षण संस्थेची निवड केल्याबद्दल आभार मानले. स्पर्धेतील पारदर्शकपणा अधोरेखीत करताना विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचनाचे महत्त्व पटवून दिले. बहुधा कोणत्याही स्पर्धा आयोजनात बक्षिसे नंतर दिली जातात. मात्र ‘आधी बक्षिसे नंतर स्पर्धा’ हा अनोखा पायंडा देशदूतने घालून दिल्याने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थीसुद्धा मोठ्या संख्येने उत्सुक असल्याचे धात्रक यांनी नमूद केले व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर रचून ठेवलेली बक्षिसे बघून विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. ‘ज्ञानदूत’ कूपन स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चर्चात्मक कौशल्य, संवेदनशीलता आणि जागरूकता विकसित होण्यास मदत मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर शिक्षक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील बक्षिसांचे मुख्याध्यापक धात्रक यांच्याकडे हस्तांतरण करण्यात आले. सायकल, टॅब, क्रिकेट किट, डिनर सेट, टिफिन बॉक्स आदी आकर्षक बक्षिसे बघून विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद व स्पर्धेबाबत उत्सुकता दिसून आली. शिक्षणासह सामान्यज्ञानात भर घालणार्‍या या स्पर्धेत देशदूतने संधी दिल्याबद्दल उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने यात सहभागी होणार असल्याचे आवर्जून सांगितले.

सदर स्पर्धा नाशिकरोड विभागातील स्व.गणेश द. धात्रक शिक्षण संस्थेच्या शाळांसाठी मर्यादित असून या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ यांसह उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. यात टॅब, रेंजर सायकल, क्रिकेट, किट, डिनर सेट, टिफिन बॉक्स आदींचा समावेश आहे. शिवाय प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास आकर्षक प्रमाणपत्र व भेट वस्तूही देण्यात येणार आहे. स्पर्धेबाबत विद्यार्थ्यांत उत्सुकता दिसून आली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!