मनोगत : ‘या’ दिवाळीत त्यांचा विसर पडू देऊ नका…

0

दिवाळी म्हणजे नवीन कपड्यांची रेलचेल, सकाळ-संध्याकाळी नवे नवे गोड पदार्थ, रात्री लख्ख प्रकाशाची आरास व सोबत कानठळ्या बसणार्‍या फटक्यांचा आवाज, असे एकूण चित्र सर्वत्र दिसून येते.

दिवाळी सण आंनदात साजरा करण्याची प्रथा आपल्या देशात आहे . परंतु आपल्या देशात कित्येक लोक आहेत की त्यांना पैसे नसल्याने दिवाळीचा सण साजरा करता येत नाही. अशा गोरगरीब लोकांची  दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानुसार परिसरातील गोरगरीब  महिलांना साडीचोळी, फराळ आणि साखरेचे वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत .

आपल्या भागात बरेचशे लोक असे आहेत कि ज्यांची  आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची असून दोन वेळा जेवणाची सोय करणे देखील त्यांना अशक्य असतांनाही ही लोक दिवाळी साजरीकरण्यासाठी उधार उसनवार करून मुलांना कपडे, फटाके विकत घेण्याचा प्रयत्न करत असतात.तर काही लोक पैशाअभावी सणच साजरा करत नाहीत. असे गोरगरीब लोक दिवाळी सणापासून वंचित राहू नये. त्यांच्या कुटुंबाला दोन गोड घास खावयास मिळावे यासाठी  गोरगरीब लोकांच्या  घरोघरी जाऊन घरातील महिलेला साडीचोळी, मुलांना दिवाळीचा फराळाचे पाकीट तर कुटुंबप्रमुखाला सणासाठी उपयुक्त किराणा सामान  घेऊन द्यावे  .

गरीब व गरजू मुलांसाठी जुने परंतु चांगल्या स्थितीतले कपडे जमवण्याचं काम हाती घेतलं पाहिजे . त्यासाठी विविध शाळांमधून व सोसायट्यांमधून कपडे देण्याचं आवाहनहि करावं तसेच दीपावलीच्या निमित्तानी त्यांना दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचं  वाटप  करून परोपकाराचा आनंद मिळवावा.तुमचा आनंद द्विगुणित होईल

गरीब, अनाथ मुलांना रजई व मिठाई वाटप करावे  दिवाळी या निराधारांबरोबर घालवून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करावा . प्रत्येकाने इतरांना दीपावलीच्या आनंदात सहभागी करण्याचा प्रयत्न करावा.

गरीब मुलांसाना दिवाळी फराळ वाटप करावे

प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा 

दिवाळीत कानठळ्या बसणार्‍या फटक्यांचा आनंद घेताना तो क्षण अनेकांना दुख देवून जातो. अतितिव्रतेच्या आवाजाचे फटाके अनेकांना कायम स्वरूपी बहिरेपण देवून जातात. तर अनेक चिमुकल्यांना शारीरिक अपंगत्व देवून जातात. त्यामुळे दिवाळी ध्वनी प्रदुषण मुक्त होण्यासाठी सर्वसामान्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे फटाक्यांच्या आवाजाने पशु-प्राण्यांनाही त्रास होतो. ते एकतर बहिरे होतात किंवा परिसर सोडून निघून जातात. आतिशबाजी ही चिनी संस्कृती आहे

दिवाळीतील वाढते वायू प्रदूषण लक्षात घेऊन त्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयन्त केले पाहिजे आणि गाव गावात  प्रदूषण (फटाके) मुक्त दिवाळी अभियान राबविले पाहिजे . याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी ,विद्यार्थ्यांनी सामूहिक शपथ घेतली पाहिजे. फटाक्यांचा अतिरेकी वापर समाज,पर्यावरण व मानव प्राणी यांच्यासाठी घातक असून पालकांनी  फटाक्यावर होणारा अनावश्यक खर्च टाळून पाल्यांना  बौद्धीक  पुस्तके घेऊन द्यावीत

या दिवाळीत दीप लावून दिवाळी साजरी करा आणि  फटाक्यांच्या खर्चाला फाटा द्या …

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.

वायू प्रदुषणापेक्षा दिवाळीत ध्वनी प्रदूषण जास्त दिसतं. फटाके जाळल्यानंतर १२५ डेसिबल पेक्षाही मोठया प्रमाणात आवाज येणार्‍या फटाक्यांवर कायद्यानं बंदी घातली गेलीय. तरीही काही माणसं मोठया प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणार्‍या फटाकांचा वापर टाळण्याचं नाव काही घेताना दिसत नाहीत. जास्त ध्वनी प्रदूषण झाल्याने कमी ऐकू येणं, उच्च रक्तदाब, हार्टअटॅक तसेच झोपे संबंधींच्याव्याधी सतावतात. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदुषणाच्या संपर्कात आल्याने तात्पुरता किंवा नेहमीसाठी बहिरेपणा होण्याची शक्यता असते.तरी हे थांबविण्यासाठी प्रदूषण (फटाके) मुक्त दिवाळीउपक्रमात सर्वांनी सामील झाले पाहिजे

यावेळी पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे, याची विद्यार्थ्यांना आणि उपस्थित नागरिकांना जाणीव करून देण्यात यावी .  फटाक्यातून कार्बन, कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन यांचे होणारे प्रदूषण, फटाक्यामुळे हवेच्या प्रदूषणात होणारी वाढ, ध्वनी प्रदूषण, प्राणी-पक्ष्यांना होणारा त्रास, क्षणार्धात फटाक्यांच्या रुपाने लाखो रुपयांचा होणारा चुराडा या पर्यावरण असंतुलित करणाऱ्या गोष्टींची जाणीव नागरिकांना करून देणे गरजेचे आहे

प्रदूषण मुक्त दिपावली उत्सव साजरा करा व गोड पदार्थ खाऊन आनंदाने दिवाळी साजरी करा. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण देण्याचा प्रयंत्न करा फटाके वाजविल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. हे रोखणे ही आपली जबाबदारी आहे. चला आपणही यात सहभागी होऊ या…

लेखक : प्रा योगेश हांडगे (लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

LEAVE A REPLY

*