Type to search

अनुभव समृध्द करणारा प्रवास

दिवाळी - अनुभव (गावाकडची दिवाळी)

अनुभव समृध्द करणारा प्रवास

Share
अफाट पसरलेला समुद्र, वेगाने किनार्‍यावरती आदळणार्‍या पांढर्‍या शुभ्र लाटा, क्षितीज रेषेलाही पुर्णपणे झाकुन टाकणारे निळेभोर आकाश, मावळतीच्या सुर्याची हलकीच केशरी छटा, वारंवार भेदणारे निळे पाणी.. नजर जराही हलवू नये, सतत पहात रहावेसे वाटणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य…

विलक्षण अनुभूती देणारी शांतता…असा अनुभव ह्या समुद्रकाठीच असणार्‍या टुमदार बंगल्यात शांतपणे बसून घेण्याची सोय… सुसज्ज बंगल्याच काय पण राजेशाही थाटात रहाण्याची सोय…अगदी स्वप्नवत वाटावा असा अप्रतिम अनुभव घ्यायचा असेल तर तामिळनाडूच्या नागपट्टीनाम जिल्ह्यातील त्र्यांब्युबार ला पर्याय नाही.

प्रवासात साईटसिंईंग करण्यासाठी सतत एका जागेहून दुसर्‍या जागी जात राहिले तर बर्‍याचदा ‘निवांतपणा’चा अनुभवच घ्यायचा राहून जातो. निसर्गातील सौंदर्याला पुर्णपणे समरसुन, अनुभवायचे राहूनच जाते. ज्यांना शांतपणे निसर्गातील रूपे न्याहाळत फिरायचे आहे त्यांच्यासाठी ही जागा खासच आहे. ह्या जागेला निसर्गसौंदर्याबरोबरच ऐतिहासिक महत्त्वही लाभलेले आहे. निवांतच एके एक क्षण अनुभवण्यासाठी ‘बंगलो ऑन दि बिच’ हा त्र्यांब्युबारमधला बंगला खरोखर अप्रतिम आहे.

त्र्यांक्युबार हे ऐतिहासिक वारसा सांगणारे ठिकाण आहे. इ.स.1620 मध्ये येथे डॅनिश लोकांनी पाय रोवले. त्यावेळपर्यंत येथे तंजावरच्या नायक राजांचे साम्राज्य होते. डॅनिश अ‍ॅडमिरल ओव्हे जेड्डे ह्याने त्यावेळी डॅनिल लोकांना व्यापारवृध्दीच्या दृष्टीने सोय व्हावी म्हणून येथे एक किल्ला बांधला. त्यासाठी तशी परवानगी रघुनाथ नायक ह्यांच्याकडून मिळवली. त्या किल्ल्याचे नामकरण ‘डॅन्सबोर्ग’ केले गेले.

हा किल्ला आजही सुस्थितीत आहे. हा किल्ला डॅनिशांच्या वस्तु, नकाशे, लिपी ह्यांना आजही जतन करतो आहे. लहानसा पण खुप टुमदार किल्ला आहे. डॅनिशांच्या काचेच्या वस्तु, लाकडी सामान, पुर्वीचे दिवे अशा अनेक गोष्टींचा संग्रह ह्या किल्ल्यात बघायला मिळतो. ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा अगदी समुद्रकिनार्‍याला लागून आहे.

त्र्यांक्युबार लहानसे पर्यटकप्रिय ठिकाण आहे. ह्याच ठिकाणी भारतातील पहिल्या प्रिंटींग प्रेसला सुरूवात झाली. रेव्हइंड झिगेनवाला आणि प्रिंप्ट जॉन एडलेट ह्यांना हे श्रेय जाते. रेव्हइंड झिगेनवाला हे प्रोटेस्टंट मिशनरी होते. ते त्र्यांक्युबारला आले. इ.स.1712 मध्ये पहिली प्रिंटींग प्रेस सुरू जाली. ह्या प्रेसद्वारे न्यु रेस्टामेंट ह्या बायबलचे प्रथमच तामिळमधील भाषांतर प्रकाशीत झाले. (1715मध्ये)

त्र्यांक्युबार येथे झियोनचर्चा ह्या भारतातील सर्वाधिक जुन्या/प्राचीन प्रोटेस्टंट चर्चची उभारणी केली गेली. झिगेनबाला यांनी 1718 मध्ये आणखीन चर्चचीही स्थापना केली.

ह्या सर्व ऐतिहासिक स्थळांना अनुभवण्यासाठी फार लांब जावे लागत नाही. अगदी जवळ ह्या सर्व वास्तु आहेत. शिवाय समुद्रकिनार्‍यावरच्या बंगल्यात रहाण्याची सोय झाली की तेथे भुतकाळ वर्तमानात अनुभवता येतो. हा बंगलाही साधा नाहीच. त्यालाही इतिहास आहे.

हा बंगला म्हणजे 19 व्या शतकातील डॅनिशांचे विशेषत: भारतातील डॅनिश गव्हर्नरचे घर आहे. पुे 1845 मध्ये हा बंगला ब्रिटीश सत्ताधार्‍यांच्या मालकीचा झाला. समुद्रकिनार्‍याला लागून असणारा हा बंगला म्हणजे एक सुखद अनुभूती आहे. ह्या बंगल्या समोर डॅन्सबोर्ग किल्ला आहे. शेजारी अफाट समुद्र आहे. बंगल्याचा आत स्विमींग पुल आहे. बंगल्याच्या भोवती पसरलेला अफाट समुद्र कितीही न्याहळला तरीही समाधान होत नाही. विलक्षण आकर्षणशक्ती ह्यात आहे.

पर्यटनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर स्थानिक लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे. त्यामुळे तेथील स्थानिक भाषा, संस्कृती, खाद्य या सर्वांचच खराखुरा परिचय होतो. प्रवास पूर्णत्वाने अनुभवता येतो. म्हणून पाँडेचारीला आल्यावरती कुठल्याही हॉटेलमध्ये राहण्याचे टाळून आम्ही थेय ‘होम-स्टे’ निवडला. ‘होम-स्टे’ ही पर्यटनाची आधुनिक निवड होत चालली आहे. ह्यात एक पूर्ण बंगलाच राहण्यासाठी आम्हाला मिळाला होता.

पाँडेचारीत अतिशय शांत असा, सभोवताली छान बगिचा असणारा हा दुमजली बंगला होता. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे छत हे काचेचे होते. त्यामुळे दिवसा सुर्यप्रकाश थेट संपूर्ण बंगल्याध्ये लख्ख उजेड पाडत असायचा. त्यात सुसज्ज स्वयंपाकगर होते. दिमतीला मदतनीस, स्थानिक खाद्याचा आस्वाद येथे घेता आला. घराबाहेरही  घराचा ‘फिल’ घेता आला. पाँडेचारी हा केंद्रशासीत प्रदेश आपल्यालाल अगदी वेगळ्याच विश्वासच घेऊन जातो. 1954 पर्यंत फ्रेंचांची वसाहत असणार्‍या पाँडेचारीत आजही फ्रेंच संस्कृतीचा खाणाखुणा सापडतात.

पाँडेचारिचा समुद्र किनारा अप्रतिम आहे. येथे अरविंद आश्रम आहे. अरविंद घोषांची समाधी येथे आहे. अरविंदांच्या ऑरविल आश्रमही पाँडेचेरीपासून जवळच ओ. येथे मित्रमंदिर सुंदर आहे. तो एक सोन्याचा घुमट असून त्यात ध्यानधारणा करता येते. जगभरातील सर्व देशांधील पुरूष-स्त्रीयांनी येथे एकत्र शांतपणे नांदण्यासाठी लहानसे गाव येथे बसवण्याचा प्रयोग चालू आहे.

पाँडेचारीला ‘फ्रेंच कॉलनी’ पाहण्यासारखी आहे. येथे फ्रेंच पध्दतीची घरांची बांधणी, रस्त्यावरचे दिवे हे डोक्याचे पारणे फिटवते. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ येथे चाखता येतात. संध्याकाळ समुद्रकिनार्‍यावरती घालवता येते.

ह्या प्रवासाचा एक महत्वाचा भाग होता महाबलीपुरम! तामिळनाडूधील सुप्रसिध्द ठिकाण. समुद्रकिनारी वसलेली सातव्या आठव्या शतकातील धार्मिक शिल्पे जगप्रसिध्द आहेत. पल्लवकालीन ही शिल्पे आहेत. प्राचीन काळात घेऊन जाते. शिवाय जवळच कृष्णाचा लोण्याचा गोळा म्हणून प्रसिध्द असणारा मोठा गोल ग्रानाईटचा साधारण 250 टन वजनाचा दगड आहे. हा उतारावरती स्थिरावलेला आहे. हे पर्यटकांचे आकर्षण आहे. महाबलीपुरमचा समुद्रकिनाराही सुंदर असून प्राचीन कलाकुसरीला येथे अनुभवता येते.

पर्यटन म्हणजे केवळ फिरणे नसतेच मुळी! ती एक सुखद अनुभूती असते. त्या त्या ठिकाणांचे अस्तित्व, तो इतिहास, त्या वास्तु हे सर्व काही अनुभवायचे असते. केवळ डोळ्यांनी बघायचे नसते तर मनानेही ह्या सर्व गोष्टींचे मुक-बोल समजून घ्यायचे असतात. ह्या सर्व स्थळांना स्वत:ची एक भाषा असते. एक अस्तित्व असते ती भाषा समजून घ्यायची असते. त्यांच्या अस्तित्वाला स्विकारून मगच पर्यटन पुर्ण होते. म्हणूनच ऐतिहासिक वास्तु आजही इतक्या आकर्षक वाटतात!

दक्षिणेचा हा प्रवास असा कायमचा मनावरती कोरलेला आहे. सर्व काही जसेच्या तसे डोळ्यापुढे उभे राहते तो समुद्रावरचा वारा आजही अनुभवता येतो. प्रवास हा खरा समृध्द करणारा अनुभव असतो हेच खरे!

[button color=”” size=”” type=”round” target=”” link=””]

काय बघाल

‘बंगलो ऑन दि बिच’ ‘डॅन्सबोर्ग’ किल्ला भारतातील पहिली प्रिंटींग प्रेस प्राचीन प्रोटेस्टंट चर्च समुद्रकिनार्‍यावरचा बंगला ‘होम-स्टे’ ही पर्यटनाची आधुनिक निवड फ्रेंच संस्कृतीचा खाणाखुणा अरविंद घोषांची समाधी फे्रंच कॉलनी ररस्त्यावरचे दिवे वेगवेगळ्या चवींचे पदार्थ पल्लवकालीन कृष्णाचा लेण्याचा गोळा म्हणून प्रसिध्द असलेला 250 टनाचा ग्रॅनाईटचा दगड.

[/button]

  • रुपाली भुसारी, पुणे
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!