स्त्री म्हणजे खेळणे नव्हे…

0

ती नाही रे खुळखुळा

जो तुम्ही वाजवाल

पुरुषी अहंकाराच्या वेशात

सत्ता तिच्यावर गाजवाल

केलं तिला तुम्ही गुलाम

हवी तशी वागवली

तिला साथीला ठेवून

फक्त भूक भागवली

तिच्यावर का हा अन्याय

जेव्हा जन्म तिच्याच पोटातून

कसे होतात रे कृत्य अन

निघतात अपशब्द ओठातून

तिला दे थोडा आधार

अन कर तिचा तू सन्मान

तेव्हाच मिळवशील सर्वकाही

अन होईल तुझा बहुमान

तिला नको समजू खेळणे

ती दोन हात तुझ्याशी करेल

जाता तिजवर धाऊन तू

धाडसाने गळा तुझा धरेल

वाट चाल तू तिच्यासोबत

नाही आहे ती कमजोर

हो फक्त आधारवृक्ष

असा नको होऊ शिरजोर

योगेश रघुनाथ वाघ, ता. बागलाण, जि. नाशिक 

मो. ७५८८७११६७४

LEAVE A REPLY

*