पाककृती : गव्हाच्या पिठाचे लाडू

0

साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, वेलची पावडर, तूप, मनूका, बदाम, काजू, अर्धा कप पिठीसाखर.

कृती : आपण प्रत्येक वेळेस दिवाळीला रव्याचे लाडू करतो, या दिवाळीत पौष्टिक आणि चविष्ट लाडू करूया.   सर्वात आधी गॅस मंद आचेवर करून त्यावर एका कढईत तूप टाकून बदाम, काजूचे बारीक काप आणि मनूका छान लाल रंग येई पर्यत भाजावे. लाल रंग आल्यावर हा सुका मेवा काढून घ्यावा.

त्यानंतर कढईत अर्धा कप तूप टाकून त्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ छान लाल रंग येईपर्यंत भाजावे. पीठ भाजून झाल्यावर त्याला थोडे थंड करावे. ज्याला आपण हात लावू शकतो एवढे पीठ थंड करून घ्यावे. त्या नंतर पिठामध्ये सुका मेवा, वेलची पावडर आणि अर्धा कप पिठी साखर टाकावे. हे मिश्रण एकत्र करून लाडू  करून सर्व करावे.

सोनिया पराग जांभुलकरनांदेड सिटीपुणे.

LEAVE A REPLY

*