पुतळेबंद महापुरुष!

0

हे महापुरुषांनो,

वर्षभरानंतर घरातील आणि सार्वजनिक ठिकाणच्या धुळ साफ झालेल्या,

आज पुनश्च एकदा जातीचा शिक्कामोर्तब होतांना पाहिलेल्या,

जयंतीदिनी दारूच्या नशेत तर्रर्र होऊन आयटम साँगच्या तालावर थिरकणार्‍यांठी निमित्तस्थळ ठरलेल्या,

एखाद्या महापुरुषाच्या जयंतीचा अथवा मोर्चा-आंदोलनाचा दिवस सोडून उरलेल्या दिवसातील आजुबाजुचा कचरा साफ करून फुलांनी सुशोभित झालेल्या,

पुढच्या पिढीसमोर तुमचा आदर्श असावा हा उद्देश बाजूला सारून तुलनेतून उभ्या केलेल्या,

राजकीय स्वार्थी दलालांची पोळी भाजावी म्हणून ‘मीच खरा जनतेचा प्रमाणिक नेता! ‘या नेत्यांच्या देखाव्याचे साधन ठरलेल्या,

एखाद्यावेळी दोन जातीत अथवा धर्मात विटंबना करून दंगल पेटविण्यासाठी भूत-वर्तमान-भविष्यात वापर करण्यासाठी लागणाऱ्या,

आंदोलन-मोर्चाचे सुरूवात करण्याचे अथवा शेवट करण्याचे ठिकाण ठरलेल्या,

जातीच्या बेड्या न तोडता त्या अधिकच घट्ट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या,

वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांच्या बातमींमध्ये भर पाडणाऱ्या,

आयुष्याची वाटचाल, ओळख करण्यापेक्षा लवकरच लक्षात यावा म्हणून एखाद्या ठिकाणचा पत्ता , रस्त्याचा मार्ग सुचविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या,

अपवादात्मक​ गोष्ट म्हणजे क्रांतीचे रणशिंग फुंकण्यासाठी, असमान व्यवस्थेला हादरे देण्यासाठी, समता-स्वातंत्र्य-बंधुता-न्यायाबरोबर क्रांती गीत गाण्यासाठी, इतिहासाचे स्मरण करण्यासाठी, जीवनात हारलेल्यांना जगणं-लढणं शिकविण्यासाठी, माणसाला माणुसकीचे धडे देण्यासाठी अल्प प्रमाणात सद्या उपयुक्त ठरत असलेल्या आणि भविष्यात अधिक उपयुक्त ठरु शकणार्‍या,

तुमच्या प्रतिमांना ( पुतळे/स्मारके/छायाचित्रे ) तुमच्या जयंतीच्या अनंतकोटी शुभेच्छा …!!!

 

– संविधान सखुबाई मधुकर गायकवाड

9096391265

LEAVE A REPLY

*