खजूर बर्फी 

0

साहित्य : खजूर, काजू, बदाम, पिस्ता, तूप, खसखस.

कृती : सर्वात आधी खजुरातील बी काढून घ्यावे. नंतर खजूर थोडे थोडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. आता गँस चालू करून त्यावर कढई ठेवा. ती गरम होताच 1 चमचा तूप टाका आणि काजू, बदाम, पिस्ता यांचे छोटे काप करून तूपामध्ये टाका. नंतर खसखस टाकून लाल रंग येइपर्यंत भाजून घ्या.

सुका मेवा भाजून झाल्यावर कढईत एका बाजूला करून त्यामध्ये बारीक केलेले खजूर टाकावे आणि त्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यावे. गॅस मंद आचेवर ठेवावा. खजूर साँफ्ट झाल्यावर खजूर सुका मेवा एकत्र करून घ्यावे.

हे मिश्रण पूर्णपणे एकत्र झाल्यावर गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होण्यास ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर मिश्रण एकत्र करून त्याला फाँईल पेपर ने गोलाकार गुंडाळून 1 तासासाठी फ्रिज मध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

एक तास झाल्यावर मिश्रण फ्रिज मधून काढून त्याचा फाँईल पेपर काढा आणि मिश्रणाचे बर्फी सारखे काप करून एका डिशमध्ये वाढा.

सोनिया पराग जांभुलकरनांदेड सिटीपुणे.

LEAVE A REPLY

*