काव्य : डिग्र्यांचं गाठोडं

0

उसाच्या रहाट गाड्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं जीन झालाय हो,
बापाच्या कर्जाच्या बोझ्याप्रमाणे हे डिग्र्यांच गाठोडं आता जड झालाय हो,

लग्नाच्या उष्ट्या पत्रावळ्या जणू, अशी उपमा आमच्या डिग्र्यांनां,
भवऱ्याप्रमाणे भिरकात असतो भान नसते आमच्या गिरक्यांना,

नटसम्राट प्रमाणे आम्ही कदाचित
डिग्रीसम्राट म्हणून नावारूपाला येणार,

कुणी नोकरी देत का नोकरी असा,
केविलवाणा प्रश्न प्रत्येकाच्या दारात प्रसादरूपी वाटणार

शिक्षणाच्या या बाजारीकरणात ,
मिरचीच्या ठेच्याप्रमाणे आम्ही ठेचले जातोय,
Right To Education नावाखाली शिक्षणाचाही आता धंदा होतोय,

आता असं वाटतंय हे डिग्र्यांचं,
गाठोडं एखाद्या नदीत सोडून द्यावं,

शिक्षणालाही कोड पडावं,
असं शिक्षणसम्राट होऊन जावं!

  • पवार गोकुळ एकनाथ 8805539706

LEAVE A REPLY

*