Video / Photo : पंडीत तायडेंच्या सुरांची आध्यात्मानूभूती
Share
नाशिक | प्रतिनिधी
प्रसन्न पहाट, फूलांच्या मंद सुंगधाने दरवळणारा परिसर. सप्तरंगी सुबक रांगोळ्यांचे मांगल्य. दिव्यांचा आरासीतून आसमंत उजवळवणारे ‘प्रकाश गान’ अन् साथीला भावपूर्ण सुरांची सुरेल पखरण. कधी बंदिशीतून उमटलेली विरहिनी तर कधी भक्तीरसात नाहून निघालेली भजने… सुर, ताल, लयांचा परस्पर संवाद इतका चपखल अन् सुरेल जणू सुरातून आध्यात्मानुभूतीच. निमित्त होते देशदूत कल्चर कट्टा उपक्रमाचा प्रारभ करणार्या पहाट मैफलीचे…!
#DeshdootCultureKatta
Posted by Deshdoot on Friday, 8 November 2019
या मैफिलीत विविध राग डॉ. तायडे यांनी सादर केले, उपस्थित प्रेक्षकांनीदेखील तेवढ्याच प्रतिसादात दाद दिली. यंदा ‘देशदूत’ आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. ‘देशदूत’ नेहमीच नाशिकच्या मातीतला, नाशिककरांच्या हक्काचा आणि नाशिकच्या विकासाचा शिल्पकार म्हणूनच आपली भूमिका बजावत आला आहे.
देशदूत कल्चर कट्टाची मुहूर्तमेढ शनिवारी(दि.9) विख्यात गायक पं अविराज तायडेंच्या सुरांनी रोेवली गेली. प्रारंभीच्या मैफलीने नव्या सांस्कृतिक पर्वाला सुरांनी अर्घ्य वाहण्यात आले. देशदूत कार्यालयात सजलेले गीतसंगीताच्या नमनाच्या मैफलीला रसिकांनी भरभरून दाद देत ‘देशदूत’शी सांस्कृतिक ऋणानुबंध अधिकच दृढ केला. पंडित अविराज तायडे यांनी राग बैरागीभैरव मधील ‘पियाँ के घर पियाँ बिन रहेना जाय’ या बंदिशींने मैफलीला प्रांंरंभ केला. विलंबित एकतालात पियाँच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या प्रेयसीच्या मनातील विरह, आतुरता त्यांनी कमवलेल्या सुरातून नजाकतीने सादर केली. त्यातील भाव, आर्तता रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. त्याला जोड देणारी ‘ओ सावरियाँ घर नही आये’ ही जोड‘गायकीला पूर्णत्व देऊन गेली. पंडित तायडेच्या भारदस्त तरीही तितक्याच भावपूर्ण स्वर आणि त्याला सहगायक डॉ. आशिष रानडे आणि ज्ञानश्वेर कासार यांनी तितक्याच तोडीने दिलेली साथ संपूर्ण मैफलिचे वैशिष्ट ठरले.
त्यानंतर सादर झालेले राष्ट्रसंत तुकडोजी महाजांचे तत्वज्ञानाकडे झुकणारे ‘मन रे तू पड परीनाम की गीता पल पल जाता जात रे बीता’ हे भजन सादर करुन पंडिजींनी सुरांची पूजा बांधली. तीन रागांचे मिश्रण करुन पंडित तावडे यांनी स्वत:च संगीतबद्ध केले असल्यामुळे त्यातील सूरसौंंंदर्याला अधिकच अधिकच तेज लाभले. जगात सारे व्यर्थ असून मनुष्यजीवन निमित्तमात्र अन् क्षणभंगूर आहे, वेळ वाया घालवू नका, ते हरिनामात गुंतवून अंहकार, मोह-माया, लोभ सोडा असा संदेश असलेल्या भजनात तावडेंसह सहकलाकारांनी भाव सुरांनी तोरण बांधले.
दरवर्षी वै. बस्तीरामजी सारडा स्मृती सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहात शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर, ह.भ.प. धुंडा महाराज देगलूरकरबुवा या वक्त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने नाशिककरांवर मोहिनी घातली होती. देगलूरकरांची पुढची पिढी हा वाक्यज्ञ पुढे चालवत आहे.
त्यानंतर तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल भजनाने कार्यक्रमाला उंची प्राप्त करुन दिली. मधुर गायिकीने विठ्ठलभक्तीचा हा सुर महिमा उपस्थितांना आध्यात्मानुभूती देऊन गेला. रसिकांचा उत्साह ओसंडून वाहताना फर्माइश येत होत्या. पंडित तायडेंने भजनाची श्रृंखला अविरत ठेवत फर्माइश म्हणून कानडी भजन भाग्यदा लक्ष्मी बारम्मा गाऊन मैफल अधिकच उंचीवर नेले. राग बिभास भैरवीतील पारंपरिक भजन ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया चरण कमल की धूल बनाने मोक्षद्वार तक आया’ या गाण्याने मैफिल कळसाध्यय गाठला. प्रत्येक गाण्यापूर्वी पंडितजींनी राग, बंदिश त्याची माहिती देत होते. ताल-लयीसुरांसह हा शब्द सुसंवाद संस्कृती कट्टयाचे उद्दिष्ट सार्थ ठरवत गेला. गायकांचा सुरेल आवाज, त्याला रसिकांनी योग्य जागी दिलेली दाद मैफलीचे वैशिष्ट ठरले. नितीन वारे(तबला) संस्कार जानोरकर(हॉर्मोनियम), अमित भालेराव(तालवाद्ये), ओकार कडवे आणि आरोह ओक (संवादिनी) यांनी तितक्याच तोडीची साथसंगत करुन कार्यक्रमात रंग भरले.
प्रारंभी देशदूतचे संचालक विक्रम सारडा यांनी पंडित तायडेंसह मान्यवर कलाकरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात ‘देशदूत’ च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी कल्चर कट्टा स्थानिक कलाकरांना हक्काचे व्यासपीठ ठरणारअसल्याचे सांगून या मंचावर ललित, सादरीकरण, दृश्य कला आणि साहित्य अशी सांस्कृतिक आदनप्रदान, चर्चा घडणार असून कलेची चळवळ अवितर सुरू राहणार असल्याचे नमूद केले. याप्रसंगी देशदूतचे संस्थापक देवकिसन सारडा उपस्थित होते.
प्रतिक्रिया अन् कौतुक
देशदूत कल्चर कट्टा उपक्रमात रसिकांना प्रतिक्रिया देता यावी म्हणून फिडबॅक वॉल उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामध्ये रसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया मांडल्या. ‘देशदूत’चा कल्चर कट्टा उपक्रम सांस्कृतिक क्षेत्राची दखल घेणारा असून त्यामाध्यमातून हक्काचे आणि मोठे व्यासपीठ मिळवून देणारा असल्याचे मत रसिकांसह कलाकारांनी व्यक्त केल
कलांची मांदियाळी
सांस्कृतिक क्षेत्राची सार्थ दखल घेणार्या देशदूत कल्चर कट्याची ओनामा सुरेल मैफलीने झाल्यानंतर ही चळवळ अवितरपणे सुरू ठेवत पूढील उपक्रमात नृत्य, वादन, चित्रकला. शिल्पकला या आणि अशा सादरीकरण, ललित कला आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्यारा कट्टा ठरणार आहे.