दिशा पटानीने शेअर केला बहिणीचा वर्दीतील फोटो

0

मुंबई- दिशा पटानी तिच्या सोशल मिडियावरील फोटोजमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या दिशा पटानी तिच्या बहिणीमुळे चर्चेत आहे. अगदी दिशा पटानी सारखीच नाजुक आणि सुंदर दिसणारी दिशाची बहिण भारतीय सैन्यात अधिकारी आहे. दिशाने तिच्या बहिणीचा वर्दीमधील एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. दिशाने आपल्या इंन्स्टाग्रामवरुन बहिण खुशबूचा वर्दीतील फोटो शेअर केला आहे. त्यानंतर हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याला मोठी पसंती मिळत आहे. याआधीही दिशाने बहिणीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. परंतु आता वर्दी फोटो शेअर केल्याने त्याची चांगलीच चर्चा आहे. दिशाची बहिण खुशबू तिची जवळची मैत्रिणही आहे. अनेक वेळा दिशाने बहिण खुशबूला तिची प्रेरणा मानत असल्याचं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

*