उपसरपंच करणार स्वखर्चातून भरपाई; बेकायदेशीर रस्ता तोडफोड प्रकरण भोवले

0
चांदवड : बेकायदेशीर व अनधिकृतरित्या रस्ता तोडफोड प्रकरण तालुक्यातील तळेगावरोही येथील उपसरपंचांच्या अंगलट आले असून याप्रकरणी झालेल्या नूकसानाची भरपाई स्वखर्चातून करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

याप्रकरणी दै. देशदूतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून तक्रारदार ग्रामपंचायत सदस्या सुशिलाबाई केदारे यांची बाजू मांडली होती.

तळेगावरोही (ता. चांदवड) या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर असलेले बाबाजी वाकचौरे यांनी ग्रामपंचायत हद्दीत ई-टेंडरिंग न राबवताच रस्ता कामाला सुरूवात करत अनधिकृतपणे रस्ता तोडला होता. याप्रकरणी ग्रा. पं. सदस्या केदारे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

याची दखल घेत चांदवड पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याबाबत विस्तार अधिकारी यांनी समक्ष भेट देऊन सरपंच शिवराम पाटील, तक्रारदार सुशिलाबाई केदारे, उपसरपंच बाबाजी वाकचौरे, इतर पाच सदस्य व ग्रामविकास अधिकारी दहिफळे यांच्या उपस्थित जबाब नोंदविण्यात आले.

यात रस्ता काम ई-टेंडरिंग न राबविता सुरू केले तसेच पाण्याचा निचरा करणारी मोरी (सिमेंट पाईप) तोडले असे जबाब नोंदविण्यात आले असून उपसरपंच वाकचौरे यांनी रस्ता काम लवकर सुरू करण्यासाठी ई-टेंडरिंग राबविली नसल्याचे सांगितले व झालेल्या नूकसानाची स्वखर्चातून भरपाई करणार असल्याचा जबाब दिला.

तसा अहवाल विस्तार अधिकार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे सपूर्त केला असून तसे पत्र माहितीस्तव तक्रारदाराला प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

*