शिवरायांबद्दल अपशब्द भोवले; उपमहापौर छिंदम यांची भाजपतून हकालपट्टी

0
अहमदनगर | शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची पक्षातून तसेच महापौर पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

याप्रकरणी छिंदम यांचा राजीनामा घेत हकालपट्टी केल्याचे खा. दिलीप गांधी यांनी जाहीर केले आहे. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्याकडून छिंदम याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. राज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द ऐकून घेणार नाही असेही ते म्हणाले.

दरम्यान छिंदम यांच्या वक्तव्याची क्लिप सोशल माध्यमांत चांगलीच व्हायरल होत असून राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

*