Type to search

जिल्ह्यातील 35 अपक्षांची अनामत जप्त

Featured सार्वमत

जिल्ह्यातील 35 अपक्षांची अनामत जप्त

Share

लोकसभा निवडणूक : नगरमधील 19 तर शिर्डीतील 18 उमेदवारांचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – नुकत्याच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नगर लोकसभा मतदारसंघात 19 उमेदवार तर शिर्डी लोकसभा मतदार संघात 20 उमेदवारांनी नशीब अजमावले. त्यापैकी दोनही मतदारसंघ मिळून 35 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यात दक्षिणेतील 17, तर शिर्डीतील 18 उमेदवारांचा समावेश आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात बसपाचे उमेदवार नामदेव वाकळे, अपक्ष कळीराम पोपळघट, धीरज बाताडे, फारूक शेखे, सुधाकर आव्हाड, संजय सावंत, अप्पासाहेब पालवे, कमल सांवत, दत्तात्रय वाघमोडे, भास्कर पाटोळे, रामनाथ गोल्हार, आबीद शेख, साईनाथ घोरपडे, नरहरी सुपेकर, संजीव भोर, संदीप सकट, श्रीधर दरेकर यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.

शिर्डी मतदारसंघातील कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार बन्सी सातपुते, अपक्ष आणि अन्या छोट्या पक्षाचे उमदेवार सुरेश जगधने, अशोक जाधव, प्रकाश आहेर, विजय घाटे, संजय सुखदान, गोविंद अमोलीक, अशोक वाकचौरे, किशोर रोकडे, गणपत मोरे, प्रदीप सरोदे, बापू रंधीर, शंकर बोरगे, भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, सचिन गवांदे, सुभाष त्रिभुवन, संपत समिंदर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचा तर शिर्डीतून शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसचे आ. भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!