आता डिपॉझिट यंत्राद्वारे द्या त्र्यंबकेश्वराला देणगी

0

त्र्यंबकेश्वर, ,(प्रतिनिधी)  ता १२ : सर्व व्यवहार ऑनलाईन आणि कार्डद्वारे होत असताना आता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरलाही आधुनिक पद्धतीने देणगी देता येणार आहे.

कार्ड स्वाईप करून डिपॉझिट यंत्राद्वारे ही देणगी देता येईल. विशेष म्हणजे त्यात देणगीदाराचे नाव येणार नसल्याने हे दान गुप्तदान समजले जाणार आहे.

महाराष्ट्र बँकेकडून हे डिपॉझिट यंत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानाला भेट देण्यात आले आहे. किमान ५० रुपये आणि अधिक रक्कम याद्वारे दान करता येते.‍ त्याची पावतीही मिळते.

त्यासाठी  देवस्थानकडे असलेल्या स्वाईप कार्डचा वापर करायचा असतो. त्र्यंबकेश्वरच्या देणगी विभागात हे यंत्र बसविण्यात आले आहे.

महाराष्ट्र बँकेचे सीईओ आणि एमडी रविंद्र मराठे यांनी या यंत्राचे उदघाटन केले.

LEAVE A REPLY

*