Saturday, April 27, 2024
Homeनाशिकशहराच्या सीमाभागात कडेकोट पोलीस बंदोबस्त

शहराच्या सीमाभागात कडेकोट पोलीस बंदोबस्त

सातपूर | प्रतिनीधी

शासनाच्या कठोर पावलांनंतर सातपूर परिसर व औद्योगिक वसाहतीतील वाहतूक पूर्णतः थांबलेली आहे. काही उद्योजकांवर कारवाई केल्यानंतर आज कारखान्यांनीही कडेकोट बंद पाळला आहे.

- Advertisement -

कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाने अतिशय कठोर पावले उचलली आहेत ठिकाणी पोलिसांनी बँरेकेटिंग लावून रस्ते बंद केल्यानंतरच वाहनचालकांची गर्दी ओसरली आहे.

सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे सातपूर पोलीस ठाण्याच्या समोर तसेच अशोक नगर चौकीजवळ अरे कटिंग लावून नाकाबंदी करण्यात आली आहे.

शहराच्या सीमा लाँक

शासनाने जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने पोलीस प्रशासनाने ही शहराच्या सीमा बंद केल्या आहेत जेणेकरून  शहरात नसलेल्या करोना व्हायरस  चा प्रादुर्भाव  शहरात येऊ नये.

हा त्यामागचा उद्देश आहे त्याअंतर्गत त्र्यंबकेश्वरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना पिंपळगाव बहुला चौकीसमोर रोखण्यात येते आहे याठिकाणी त्यांच्या कामाची निकड व व अत्यावश्यक चा लक्षात घेऊनच व त्यासोबतच त्यांच्या स्वास्थ्य बाबाची संपूर्ण चौकशी करून शहरात प्रवेश दिला जात आहे या संपूर्ण प्रक्रियेवर पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी सातत्याने भेट देऊन लक्ष ठेवलेले आहे.

दरम्यान, सदर परिसरात आपल्या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी बाहेर पडलेल्या वाहनांची मोठी गर्दी पंपाच्या बाहेर दिसणारे या गर्दीला यासाठी सातत्याने पोलिसांना लाठीचा वापर करावा लागला.

नागरीकांनी घरीच रहावे

करुणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केलेली आहे त्यासोबतच वाहन बंदीही लागू केलेली आहे त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर वाहने आणू नये तसे आढळल्यास कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल नुकतीच सातपूर पोलिस ठाण्याच्या वतीने आठ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

राकेश हांडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या