गटार योजनेचा बोजवारा; काही ठिकाणी तुंबले; विद्यार्थीसेनेची घोषणाबाजी

0
नाशिक | नाशिकमध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावत तारांबळ उडवली. पहाटेपासून जोरदार पावसाने बटिंग केली. गटार योजनेचा बोजवारा उडाल्याने  सातपूर परिसरात तर नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर पाणी साचल्याने एका बाजूचा रस्ताच बंद करण्यात आला होता.

सातपूर येथे रस्त्यावर पाणी साचल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दत्तक घेतलेल्या नाशिकची दुर्दशा झाल्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले असून पहिल्याच मुसळधार पावसात नाशिक ठिकठिकाणी तुंबल्याने रोष व्यक्त केला आहे.

तर मखमलाबाद रस्त्यावर तर पाणी तुंबल्याने रस्ता वाहून गेला. पावसाचे पाणी वाहून जाण्यास रस्ता लगत असलेल्या चार्यातील माती न उकरल्याने पाणी रस्त्यावरून वाहते आहे.

यामुळे काहीशा प्रमाणात रस्त्याचे नुकसान झाले असून रस्ता वाहून गेला.

LEAVE A REPLY

*